Mahabreaking

🔴 BREAKING
Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह

Maize procurement suspended :नोंदणी २ हजार शेतकऱ्यांची, खरेदी फक्त २६५ची! मका खरेदी बंद

Maize procurement suspended : तालुक्यातील शासकीय मका खरेदी केंद्रांची मुदत संपल्याचे व उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत खरेदी प्रक्रिया अचानक बंद करण्यात आल्याने हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उर्वरित मक्याची खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून खरेदी केंद्रांना तातडीने मुदतवाढ देऊन उद्दिष्ट वाढवावे, अशी जोरदार मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

Maize procurement suspended

मोताळ्यात शेतकरी आर्थिक संकटात

मोताळा : तालुक्यातील शासकीय मका खरेदी केंद्रांची मुदत संपल्याचे व उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत खरेदी प्रक्रिया अचानक बंद करण्यात आल्याने हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उर्वरित मक्याची खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून खरेदी केंद्रांना तातडीने मुदतवाढ देऊन उद्दिष्ट वाढवावे, अशी जोरदार मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्यातील मक्याच्या खरेदीसाठी किसान अॅ्ग्रोएकर्स फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, विदर्भ सहकारी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि अॅयग्रीड्स फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या तीन खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती. या केंद्रांवर सुमारे २ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती; मात्र ३१ जानेवारीपर्यंत केवळ २६५ शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात आला. परिणामी सुमारे साडेसतराशे शेतकऱ्यांचा मका अद्याप खरेदीविना पडून असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
खरेदीची मुदत संपल्याने व उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करत प्रक्रिया बंद करण्यात आल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी मका विक्री करायचा तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारात मक्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर मका खरेदी केंद्रांना तातडीने मुदतवाढ देऊन खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी (दि. ४ फेब्रुवारी) तहसीलदारांना देण्यात आले असून त्यावर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रवीण कदम व किसान सेलचे नितीराजसिंह राजपूत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top