Mahabreaking

[breaking_news]

Tehsildar Pratiksha Tejankar: ‘लेखणीच्या माध्यमातून समाजजागृती करा’ – तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर  

Tehsildar Pratiksha Tejankar: सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्थानिक संजीवनी सेवाभावी परिवारतर्फे वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या वेळी रिसोड (जि. वाशिम) येथील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना “लेखणीच्या माध्यमातून समाजजागृतीचे महान कार्य करा” असे आवाहन केले.

Pratiksha Tejankar

डोणगाव येथे पत्रकारांचा ‘संजीवनी दर्पण’ पुरस्काराने गौरव

डोणगाव : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्थानिक संजीवनी सेवाभावी परिवारतर्फे वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या वेळी रिसोड (जि. वाशिम) येथील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना “लेखणीच्या माध्यमातून समाजजागृतीचे महान कार्य करा” असे आवाहन केले.

दि. १ फेब्रुवारी रोजी राजुरकर मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बाप्पू देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आघाव, तसेच भारत मोरे, अनिल आवटी, अकबरखा पठाण, डॉ. गजानन उल्हामाले, राजेंद्र पळसकर, दीपक पाटील आखाडे, बबनराव पळसकर, डॉ. नकुल फुले आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वर्गीय डॉ. जगदीश बिडवई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामीण पत्रकारांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने ‘संजीवनी दर्पण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी अशोकराव वानखेडे, नवल राठोड, सादिक कुरेशी, गजानन देशमुख आणि रवींद्र वाघ या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हमीद मुल्लाजी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेंद्रसिंग चव्हाण यांनी मानले. पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद बाप्पू देशमुख, तालुका अध्यक्ष गजानन चनेवार, सिद्धेश्वर पवार, कैलास राऊत, तसेच डोणगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन गाभणे, राजेश वाघमारे, सुरेश आप्पा फिसके, रफीक कुरेशी, दत्ता उमाळे, विष्णू आखरे, अबरार खान मिल्ली, गजानन नरवाडे आदींनी अभिनंदन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top