Mahabreaking

[breaking_news]

Ajitdada Pawar :स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलशाचे खडकपूर्णा प्रकल्पात विधिवत विसर्जन

Ajitdada Pawar : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलशाचे देऊळगाव राजा येथे आगमन झाल्यानंतर गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी संत चोखामेळा सागर (खडकपूर्णा) प्रकल्पात विधिवत पूजन करून अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले. या वेळी शेकडो अनुयायांनी अश्रूंच्या साक्षीने आपल्या लाडक्या नेत्यास अखेरचा निरोप दिला.

Ajitdada Pawar

देऊळगाव राजात शेकडो अनुयायांनी घेतले अस्थिकलशाचे भावपूर्ण दर्शन : अश्रूंच्या साक्षीने आपल्या लाडक्या नेत्यास दिला अखेरचा निरोप

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलशाचे देऊळगाव राजा येथे आगमन झाल्यानंतर गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी संत चोखामेळा सागर (खडकपूर्णा) प्रकल्पात विधिवत पूजन करून अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले. या वेळी शेकडो अनुयायांनी अश्रूंच्या साक्षीने आपल्या लाडक्या नेत्यास अखेरचा निरोप दिला.

देऊळगाव राजा येथील बस स्थानक चौकात दुपारी २ वाजता पवित्र अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. ग्रामीण भागातून तसेच तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या शेकडो नागरिक, कार्यकर्ते व चाहत्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. परिसरात शोकाकुल वातावरण असून ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांनी परिसर भारावून गेला होता.

स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शनाची सुरुवात सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मस्थान परिसरातून झाली होती. त्यानंतर लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, वरवट बकाल, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मोताळा, बुलढाणा, चिखली आणि देऊळगाव राजा अशा विविध ठिकाणी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.

Ajitdada Pawar

कार्यक्रमाच्या नियोजनानुसार गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता संत चोखामेळा सागर (खडकपूर्णा) प्रकल्प येथे मंत्रोच्चार, धार्मिक विधी व पूजनानंतर पवित्र अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले. या वेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

या प्रसंगी आमदार मनोज कायंदे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार दिलीपकुमार सांनदा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, नरेश शेळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नंदाताई कायंदे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, बालाजी संस्थानचे विश्वस्त विजयसिंह राजे जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर जाधव, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, माजी सभापती रियाजखान पठाण, राष्ट्रवादी नेते डॉ. रामप्रसाद शेळके, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष भाई दिलीपकुमार खरात, युवा नेते सतीश कायंदे, देऊळगाव राजा नगराध्यक्षा माधुरीताई शिपणे, सिंदखेड राजा युवा नगराध्यक्ष वैभव तायडे,तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी, नायब तहसीलदार मुंडे, गटनेते प्रदीप वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, प्रा. दिलीपकुमार झोटे , ज्येष्ठ नेते प्रकाश गीते,धनश्रीराम शिपणे, गजानन काकड, प्रा.सदाशिव मुंढे, राजेश इंगळे, दीपक बोरकर,गजानन पवार, नितीन शिंगणे, गणेश सवडे, उद्धव नाना म्हस्के, महेश देशमुख, सिद्धार्थ जाधव, सुनिल शेजूळकर, उमेश खरात, गोपाळ देव्हडे, दादाराव खार्डे, यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते विविध पक्षाचे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय, शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्यासह विविध पक्षांचे जिल्हा, तालुका व शहरस्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण काढत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात व जनमानसात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top