Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

Shri Sant Gajanan Maharaj :जांभोरा व पिंपळगाव सोनारा येथील श्री संत गजानन महाराज पालखीचे भक्तिभावाने स्वागत

Shri Sant Gajanan Maharaj :दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त शेकडो पायदळ दिंड्या शेगाव नगरीकडे मार्गस्थ झाल्या आहेत. गावोगावी या पालखी दिंड्यांचे भक्तीभावाने स्वागत करण्यात येत असून संत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

Shri Sant Gajanan Maharaj

 

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात भाविक नामस्मरणात तल्लीन

साखरखेर्डा : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त शेकडो पायदळ दिंड्या शेगाव नगरीकडे मार्गस्थ झाल्या आहेत. गावोगावी या पालखी दिंड्यांचे भक्तीभावाने स्वागत करण्यात येत असून संत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

Shri Sant Gajanan Maharaj

दि. ४ फेब्रुवारी रोजी साखरखेर्डा येथे जांभोरा व पिंपळगाव सोनारा येथील पालखी दिंड्यांचे आगमन होताच ग्रामस्थांनी श्री संत गजानन महाराजांचे पूजन करून वंदन केले. ‘गण गण गणात बोते’ या नामस्मरणात संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.जांभोरा येथील संत सावता माळी भजनी मंडळाची दिंडी दि. ३ फेब्रुवारी रोजी जांभोरा येथून प्रस्थान झाली. दुसरबीड व मलकापूर पांग्रा येथे भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर नाथाभाऊ दराडे यांनी दिंडीसाठी भोजन व निवासाची व्यवस्था केली. सकाळी साखरखेर्डा येथे दिंडीचे आगमन होताच ग्रामस्थांनी पूजन करून दर्शन घेतले.यावेळी रामभाऊ मंडळकर यांनी चहापाण्याची, तर माजी सरपंच सुनील जगताप यांनी भोजनाची व्यवस्था केली.

या प्रसंगी सुमन सुनील जगताप, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, ठाणेदार गजानन करेवाड, कमलाकर गवई, ललित अग्रवाल, पुरवठा निरीक्षक व्ही. के. जगताप, पत्रकार अशोक इंगळे, दिलीप बेंडमाळी, दिलीप इंगळे, दादाराव गवई यांच्यासह अनेक भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

दरम्यान, पिंपळगाव सोनारा येथील फुलगिर बाबा मंडळाच्या भक्तांनी आयोजित केलेल्या पालखी सोहळ्याने दि. ४ फेब्रुवारी रोजी रात्री साखरखेर्डा येथील श्री रोकडोबा हनुमान मंदिरात विसावा घेतला. येथे माजी सरपंच महेंद्र पाटील व पुनम महेंद्र पाटील यांनी श्री संत गजानन महाराजांची आरती करून दर्शन घेतले व सर्व भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली. यावेळी गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.सकाळी वाजत-गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. मार्गातील प्रत्येक ठिकाणी महिलांनी मनोभावे पूजन केले. संपूर्ण गावाच्या मुख्य रस्त्यावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्याने परिसर अधिकच भक्तिमय झाला होता.

तसेच, साखरखेर्डा येथील श्री शिवाजी महाराज नगरात श्री संत योगी गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गजानन महाराज ग्रंथ पारायण, किर्तन व नामस्मरण सुरू असून दि. ७ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद वितरण व ग्रंथ मिरवणुकीने या धार्मिक कार्यक्रमांची सांगता होणार आहे. दि. १ फेब्रुवारीपासून साखरखेर्डा येथूनही शेकडो पायदळ दिंड्या शेगाव नगरीकडे प्रस्थान करत असून, या दिंड्यांमधील भाविकांसाठी नागरिकांकडून चहा-पाणी, नाश्ता व भोजनाची सेवा केली जात आहे. संपूर्ण परिसरात धार्मिक शिस्त, सेवाभाव व भक्तीचा महासागर पाहायला मिळत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top