Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

MLA Cup Cricket Tournament :आमदार चषक क्रिकेट स्पर्धा; शहरी गटात छत्रपती संभाजीनगर तर ग्रामीणमध्ये साखरखेर्डा विजयी

MLA Cup Cricket Tournament : मलकापूर पांगरा येथील साई सरकार क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित २०२६ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे खुले सामने मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. स्पर्धेचे बक्षीस वितरण 30 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

MLA Cup Cricket Tournament

 फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा : मलकापूर पांगरा येथील साई सरकार क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित २०२६ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे खुले सामने मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. स्पर्धेचे बक्षीस वितरण 30 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत शहरी गटातून संभाजीनगर संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर ग्रामीण गटात साखरखेर्डा संघाने प्रथम आणि दरेगाव संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. शहरी संभाजीनगर संघाला प्रथम बक्षीस आशिष दाभेरे यांच्या हस्ते, ग्रामीण साखरखेर्डा संघाला प्रथम बक्षीस बीबीचे सरपंच दीपक गुलमोहर यांच्या हस्ते, तर ग्रामीण दरेगाव संघाला द्वितीय बक्षीस प्रदीप कुहीटे (पी.के. सर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन माननीय आमदार मनोजभाऊ कांयदे यांचे बंधू सतीशभाऊ कांयदे, नगरपरिषद देवळगाव राजा येथील गटनेते प्रदीप उर्फ छोटूभाऊ, साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, बीबी पोलीस स्टेशनचे एपीआय चंद्रकांत पाटील, मांडवा सरपंच राजेभाऊ कुहीटे, बीबी उपसरपंच भास्करभाऊ खुळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते.

२०२६ आमदार चषक स्पर्धेसाठी  प्रथम बक्षीस : ५१,००० रुपये,  द्वितीय बक्षीस : ३१,००० रुपये,  तृतीय बक्षीस : २१,००० रुपये यासह उत्कृष्ट खेळाडूंना सायकल, शूज, तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी २,१०० रुपये अशी विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. ही स्पर्धा साई सरकार क्रिकेट ग्राउंड अकॅडमी, दुसरबीड फाटा, मलकापूर पांग्रा येथे आयोजित करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top