Mahabreaking

[breaking_news]

Administrator rule :सिंदखेडराजा तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज

Administrator rule : सिंदखेडराजा तालुक्यातील एकूण ८१ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ४३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ ९ फेब्रुवारी रोजी संपत असून, १० फेब्रुवारीपासून या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज लागू होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये तालुक्यातील अनेक मोठ्या व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याने स्थानिक राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Administrator rule

 ९ फेब्रुवारीला मुदत संपणार, राजकीय हालचालींना वेग

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील एकूण ८१ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ४३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ ९ फेब्रुवारी रोजी संपत असून, १० फेब्रुवारीपासून या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज लागू होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये तालुक्यातील अनेक मोठ्या व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याने स्थानिक राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

बुलढाणा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आरक्षण सोडतीच्या चक्रव्यूहात अडकल्याने, जोपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका होण्याची शक्यता धूसर बनली आहे. परिणामी, ग्रामपंचायत पातळीवरील लोकशाही प्रक्रियेला ब्रेक लागला असून, प्रशासक राज लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या ४३ ग्रामपंचायतींमध्ये साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगाव राजा या तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनेक ग्रामपंचायतींनी विकासकामांचा वेग घेतला असताना, जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर झालेली अथवा मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली कामे प्रशासकीय प्रक्रियेत अडकल्याने अनेक ठिकाणी विकासकामांना ब्रेक लागला आहे.यामुळे संबंधित मतदारसंघांमध्ये दबावाचे राजकारण पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा असून, प्रशासक नियुक्तीचा फायदा कोणाला होणार, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

 या ग्रामपंचायतींचा संपणार आहे कार्यकाळ

राजेगाव, गोरेगाव, दुसरबीड, वसंतनगर, सुलजगाव, विझोरा, सायाळा, भोसा, पळसखेड चक्का, तांदुळवाडी, वडाळी, कुंबेफळ, जागदरी, खामगाव, दत्तापूर, देऊळगाव कोळ, पिंपळखुटा, आंबेवाडी, हनवतखेड (मलकापूर पांग्रा), कोणाटी, हनवतखेड (महा), वाघोरा, डावरगाव, भंडारी, हिवरा गडलिंग, जळगाव, डोरव्ही, उमनगाव, कंडारी, साखरखेर्डा, चिंचोली, गारखेड, पिंपळगाव लेंडी, सोनोशी, राहेरी बु., नाईकनगर, शेंदुर्जन, किनगाव राजा, मलकापूर पांग्रा, पिंपरखेड बु., लिंगा, पोफळ शिवणी या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top