Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Ajitdada Pawar :लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलशाचे जिल्हाभरात होणार दर्शन

Ajitdada Pawar : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या पवित्र अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात दि. ३ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या भावनिक व श्रद्धेच्या कार्यक्रमास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच समाजातील विविध घटक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी केले आहे.

Ajitdada Pawar

३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यातील विविध शहरांत होणार आगमण; ५ फेब्रुवारीला खडकपूर्णा प्रकल्पात विसर्जन

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या पवित्र अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात दि. ३ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या भावनिक व श्रद्धेच्या कार्यक्रमास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच समाजातील विविध घटक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी केले आहे.

Ajitdada Pawar

या पवित्र कार्यक्रमांतर्गत अस्थिकलशाचे दर्शन सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मस्थान परिसरातून सुरू होणार असून, त्यानंतर लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, वरवट बकाल, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मोताळा, बुलढाणा, चिखली व देऊळगाव राजा अशा विविध ठिकाणी दर्शनासाठी अस्थिकलश ठेवण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार, सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मस्थान समोर, लोणार येथे विनायक कापड केंद्र चौक,

मेहकर येथे अशोक हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका, खामगाव येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ, शेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक (मुक्काम – शेगाव), वरवट बकाल (ता. संग्रामपूर) येथे कॉटन मार्केट,जळगाव जामोद येथे दुर्गा चौक,नांदुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, मलकापूर येथे हनुमान चौक,

मोताळा येथे मोताळा फाटा (मुक्काम – बुलढाणा), बुलढाणा येथे गांधी भवन,चिखली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका, आणि देऊळगाव राजा येथे बस स्टँड चौकात पवित्र अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता संत चोखामेळा सागर (खडकपूर्णा) प्रकल्प येथे पवित्र अस्थिकलशाचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top