Mahabreaking

🔴 BREAKING
Self-Defense Training :बुलढाण्यात नारीशक्तीला मिळणार स्वसंरक्षणाचे धडे! The thieves have crossed all limits :चोरट्यांची हद्दच झाली, शेततळ्यातील ताडपत्रीच केली लंपास ; जवळखेड शिवारातील घटना Sanghatan Srujan Abhiyan :‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पातुरात बैठक ; काँग्रेसच्या बळकटीसाठी मंथन Public Awareness Campaign  :प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेविषयी जनजागृती Three Gas Cylinders Explode :हॉटेलातील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट;  वृध्दासह दोन जण जखमी dead monkey :खिरपुरी येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याने खळबळ Self-Defense Training :बुलढाण्यात नारीशक्तीला मिळणार स्वसंरक्षणाचे धडे! The thieves have crossed all limits :चोरट्यांची हद्दच झाली, शेततळ्यातील ताडपत्रीच केली लंपास ; जवळखेड शिवारातील घटना Sanghatan Srujan Abhiyan :‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पातुरात बैठक ; काँग्रेसच्या बळकटीसाठी मंथन Public Awareness Campaign  :प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेविषयी जनजागृती Three Gas Cylinders Explode :हॉटेलातील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट;  वृध्दासह दोन जण जखमी dead monkey :खिरपुरी येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याने खळबळ

tampering and alterations :मोहना बु. ग्रामपंचायतीत घोळच घोळ; अभिलेखांत खोडाखोड व फेरफार

tampering and alterations : ग्रामपंचायत मोहना बु. (ता. मेहकर) येथील शासकीय अभिलेखांमध्ये जाणीवपूर्वक खोडाखोड, फेरफार व चुकीच्या नोंदी केल्याप्रकरणी प्रभारी सरपंच, विद्यमान सरपंच तसेच तीन तत्कालीन ग्रामसेवकांविरुद्ध जानेफळ पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मेहकर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिवाजी शेषराव गवई यांनी तक्रार दाखल केली होती.

tampering and alterations
प्रभारी व विद्यमान सरपंचांसह तीन तत्कालीन ग्रामसेवकांवर गुन्हा; विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून जानेफळ पोलिसांची कारवाई

मेहकर : ग्रामपंचायत मोहना बु. (ता. मेहकर) येथील शासकीय अभिलेखांमध्ये जाणीवपूर्वक खोडाखोड, फेरफार व चुकीच्या नोंदी केल्याप्रकरणी प्रभारी सरपंच, विद्यमान सरपंच तसेच तीन तत्कालीन ग्रामसेवकांविरुद्ध जानेफळ पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मेहकर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिवाजी शेषराव गवई यांनी तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार, ग्रामपंचायत मोहना बु. येथील नमुना ८ मध्ये खोडाखोड करून घरमालकाच्या कॉलममध्ये ‘सरकारी अतिक्रमण’ अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थ वैभव करे, गणेश हिरामण चव्हाण यांच्यासह इतर नागरिकांनी वेळोवेळी संबंधित सरपंच व सचिवांविरुद्ध कार्यालयीन कारवाईसाठी आमरण उपोषण तसेच आत्मदहनाची निवेदने दिली होती.
या प्रकरणाची जिल्हास्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात आली. समितीने १ ते ९ अभिप्राय नोंदवून नमुना ८ मध्ये खोडाखोड झाल्याचे स्पष्ट केले आहे. सन २०१६-१७ पासून अभिलेखांत सातत्याने खोडाखोड झाल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे. ग्रामपंचायतीचे अभिलेख सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सरपंच व सचिवांची असताना त्यांनी शासकीय अभिलेखांमध्ये जाणीवपूर्वक फेरफार व चुकीच्या नोंदी केल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात सन २०१६-१७ मधील ग्रामसेवक विष्णु आंधळे, सन २०१७ ते २०२१ मधील ग्रामसेवक उमेश नारायण शेवाळे, सन २०२१ ते २०२४ मधील ग्रामसेवक वाय. जी. बचाटे, सन २०१९ ते २०२१ मधील प्रभारी सरपंच सुरेश जानकीराम आडे, तसेच सन २०२१ पासून आजपर्यंतच्या विद्यमान सरपंच अंजली सुनील राठोड यांनी शासकीय अभिलेखांत जाणीवपूर्वक खोडाखोड व फेरफार करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर जानेफळ पोलिसांनी प्रभारी सरपंच, विद्यमान सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष बी. जाधव करीत आहेत.

शासकीय जमीन प्रभारी सरपंचांच्या नावावर केल्याचा आरोप
याशिवाय, तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की तत्कालीन ग्रामसेवक विष्णु आंधळे यांनी मोहना बु. येथील गट क्रमांक १५० मधील शासकीय जमिनीच्या कागदपत्रांत फेरफार करून सदर जमीन तत्कालीन प्रभारी सरपंच सुरेश जानकीराम आडे यांच्या नावावर चुकीची नोंद केली. तसेच संबंधित जमीन जीवो कंपनीला भाडेपट्ट्यावर देऊन स्वतः आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top