Mahabreaking

[breaking_news]

man smuggling marijuana : दुचाकीवर गांजाची तस्करी करणारा जेरबंद; ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

man smuggling marijuana :  पुसद–शेंबाळपिंपरी मार्गावर गांजा विक्रीच्या उद्देशाने दुचाकीवरून वाहतूक करणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखा, पुसद कॅम्पच्या पथकाने अटक केली. ही कारवाई २८ जानेवारी रोजी करण्यात आली.

A man smuggling

पुसद : पुसद–शेंबाळपिंपरी मार्गावर गांजा विक्रीच्या उद्देशाने दुचाकीवरून वाहतूक करणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखा, पुसद कॅम्पच्या पथकाने अटक केली. ही कारवाई २८ जानेवारी रोजी करण्यात आली.

खबऱ्यांमार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागात गस्तीवर असलेल्या पथकाने वरिष्ठांना माहिती देऊन पुसद–शेंबाळपिंपरी मार्गावर सापळा रचला. छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने बजाज प्लॅटिना (क्रमांक MH-22 AG 0042) या दुचाकीवरून एक इसम येताना दिसताच त्यास थांबवून तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान संबंधित इसमाने आपले नाव सुनील प्रेमचंद जोशी (वय ४८), रा. विठ्ठल मंदिराजवळ, वार्ड क्र. २, शेंबाळपिंपरी असे सांगितले. त्याच्या जवळील पिशवीतून १ किलो ६६५ ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त केलेल्या अमली पदार्थाची अंदाजे किंमत ७८,३०० रुपये आहे.

या प्रकरणी मुद्देमाल जप्त करून दोन इसमांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अमली औषधी व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top