Mahabreaking

[breaking_news]

Republic Day :बीबी येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Republic Day : बीबी येथे शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, महावितरण कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, पोलीस स्टेशन, अद्विका महाविद्यालय, सहकार विद्या मंदिर, बँका तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालये, सोसायट्या व विविध संस्थांमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Republic Day

रमेश खंडागळे 

बीबी : बीबी येथे शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, महावितरण कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, पोलीस स्टेशन, अद्विका महाविद्यालय, सहकार विद्या मंदिर, बँका तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालये, सोसायट्या व विविध संस्थांमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

वसंतराव नाईक महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून संस्थेचे अध्यक्ष अभय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच वसंत प्राथमिक शाळा, बीबी येथे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी शाळेची माजी विद्यार्थिनी आरती खंडागळे हिने विद्यापीठस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. वसंतराव नाईक विद्यालय व वसंत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, नाटिका, कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाला बीबी येथील ज्येष्ठ नागरिक, आजी-माजी सैनिक, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष उपस्थित होते. उद्घाटक म्हणून श्री. एस. व्ही. जारे (मुख्याध्यापक, जिजामाता माध्यमिक विद्यालय, हिवरा खुर्द) लाभले. प्रमुख उपस्थितीत श्री. अभय जगराव चव्हाण (रामकृष्ण परमहंस शिक्षण प्रसारक मंडळ, हनवतखेड), श्री. जी. डब्ल्यू. कुंभारे (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती लोणार), श्री. प्रदीप मिठाराम राठोड (माजी सभापती), श्री. एस. यू. बोरकर (केंद्रप्रमुख, बीबी), श्री. चंद्रकांत पाटील (ठाणेदार, पोलीस स्टेशन बीबी), श्री. बबनराव बनकर (माजी सरपंच), श्री. तुळशीराम करपे (माजी सरपंच), श्री. दीपक गुलमोहर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top