Mahabreaking

[breaking_news]

Sakharkherda :साखरखेर्ड्यात दादांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Sakharkherda :राज्याचे तडफदार व कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच साखरखेर्डा परिसरात शोककळा पसरली. या दुःखद घटनेनंतर सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र येत तीव्र हळहळ व्यक्त केली. “महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील कर्तबगार नेत्याला आज आपण पोरके झालो असून, ही राजकीय व सामाजिक पोकळी कधीही भरून न येणारी आहे,” अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

 

Sakharkherda
साखरखेर्डा : राज्याचे तडफदार व कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच साखरखेर्डा परिसरात शोककळा पसरली. या दुःखद घटनेनंतर सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र येत तीव्र हळहळ व्यक्त केली. “महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील कर्तबगार नेत्याला आज आपण पोरके झालो असून, ही राजकीय व सामाजिक पोकळी कधीही भरून न येणारी आहे,” अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.
येथील बसस्थानक परिसरात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी सर्वप्रथम अजितदादांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शोकसभा घेऊन सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.), राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.), भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), वंचित बहुजन महासंघ आदी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी दिलेल्या शब्दांचे पक्के व निर्णयक्षम नेतृत्व करणाऱ्या अजितदादांच्या झंझावाती सामाजिक व राजकीय जीवनप्रवासावर माजी प्राचार्य डी. एन. पंचाळ यांनी प्रकाश टाकला. त्यांनी अजितदादांचे कार्य, जनतेशी असलेली नाळ व प्रशासनातील ठाम भूमिका यांचा आढावा घेतला.
या श्रद्धांजली कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, शिवसेनेचे माजी सरपंच महेंद्र पाटील, भाजपचे राज्य प्रतिनिधी रावसाहेब देशपांडे, माजी समाजकल्याण सभापती बाबुराव मोरे, उपसरपंच संग्राम राजपूत, माजी सरपंच कमलाकर गवई, रामदाससिंग राजपूत, आशिष पोंधे, चंद्रशेखर शुक्ल, ललित अग्रवाल, माजी उपसरपंच अय्यूब शेठ कुरेशी, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष मंडळकर, युवासेनेचे संदीप मगर, दादाराव गवई, सुनील रिंढे, दर्शन गवई, दिलीप इंगळे, सुनील जगताप, बबन अग्रवाल, नंदू कोतवाल, आदित्य तिवारी, गोपालसिंग राजपूत, सिताराम काळे, शुभम राजपूत, जमना प्रसाद तिवारी, नारायण अग्रवाल, संदीप खिल्लारे, देवानंद खंडागळे, राजू लोढे, अशोक इंगळे, संतोष गाडेकर, आसाराम कामे आदी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा परिसरातील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा व महाविद्यालये बंद ठेवून नागरिकांनी शोक व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top