Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

Divya Seva Projects Festival :दिव्य सेवा प्रकल्पाचा ‘उत्सव नात्यांचा’; अनोखा जन्मदिवस कार्यक्रम उत्साहात साजरा

Divya Seva Projects Festival : समाजात वाढत्या स्वार्थी प्रवृत्तींच्या काळात माणुसकी जपणारे हात दुर्मिळ होत चालले असताना दिव्य सेवा प्रकल्प मानवतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. या प्रकल्पाच्या कार्याची पाहणी केल्यानंतर दिव्य सेवा प्रकल्पाचे संचालक अशोक काकडे व ज्योतीताई काकडे यांनी माणसात देव शोधला आहे, याची प्रचिती येते. त्यांच्या कार्यातून मनोयात्रींना मायेची ऊब मिळत असून, आजपर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून ७८२ पेक्षा अधिक मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. सध्या १०० हून अधिक मनोरुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी दिली.

Divya Seva Projects Festival

काकडे दांपत्यांनी माणसात देव शोधत मनोयात्रींना मायेची ऊब दिली : अमोल गायकवाड

बुलढाणा : समाजात वाढत्या स्वार्थी प्रवृत्तींच्या काळात माणुसकी जपणारे हात दुर्मिळ होत चालले असताना दिव्य सेवा प्रकल्प मानवतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. या प्रकल्पाच्या कार्याची पाहणी केल्यानंतर दिव्य सेवा प्रकल्पाचे संचालक अशोक काकडे व ज्योतीताई काकडे यांनी माणसात देव शोधला आहे, याची प्रचिती येते. त्यांच्या कार्यातून मनोयात्रींना मायेची ऊब मिळत असून, आजपर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून ७८२ पेक्षा अधिक मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. सध्या १०० हून अधिक मनोरुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी दिली.

बेघर, बेवारस व निराधार मनोयात्रींचा सामूहिक वाढदिवस ‘उत्सव नात्यांचा’ हा अनोखा कार्यक्रम मंगळवार, दि. २७ जानेवारी रोजी दिव्य सेवा प्रकल्पात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. स्नेहाताई भंडारे होत्या. प्रमुख उपस्थितीत अमृता गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई पाखरे, शाहिनाताई पठाण, प्रज्ञाताई लांजेवार, वैशालीताई तायडे, ज्योतीताई धंदर, संस्कृती अर्बनचे निलेश गोरे, अमोल भिल्लारी, पत्रकार राजेश डीडोळकर, वामन राठोड, प्रा. ज्ञानेश्वर बावणे व त्र्यंबक टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड म्हणाले की, समाजाने अनेकदा नाकारलेल्या या मनोयात्रींना काकडे दांपत्य आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपते, त्यांची काळजी घेते आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देते. देव मंदिरात नसून माणसात आहे, याची जाणीव काकडे दांपत्यांचे कार्य पाहिल्यावर होते. मानसिक आजारग्रस्तांना उपचार, आधार, निवारा आणि प्रेम देत त्यांचे पुनर्वसन करण्याचे अवघड पण पवित्र कार्य दिव्य सेवा प्रकल्पातून सुरू असून, हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी अमोल गायकवाड यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गीतगायन करत मनोयात्रींचा उत्साह वाढविला.

अडचणींवर मात करत सेवा सुरूच : अशोक काकडे
दिव्यांग व मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या दिव्य सेवा प्रकल्पाच्या कार्याचा आढावा देताना संचालक अशोक काकडे यांनी मनोयात्रींची काळजी घेताना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला. मानसिक आजारग्रस्तांची सेवा ही केवळ वैद्यकीय उपचारांपुरती मर्यादित नसून, त्यांच्या वर्तनातील बदल, भावनिक चढ-उतार, कुटुंबीयांची अनुपस्थिती आणि समाजातील गैरसमज अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तरीही या सर्व अडचणींवर मात करत मनोयात्रींना आधार, उपचार व मायेचे वातावरण देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोयात्रींच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने
कार्यक्रमात दिव्य सेवा प्रकल्पातील मनोयात्रींनी आपल्या विविध कलागुणांचा सुंदर अविष्कार सादर केला. वैयक्तिक व सामूहिक नृत्य, गीतगायनासह भक्तीमय वातावरणात हनुमान चालीसा पठण व प्रार्थना सादर करण्यात आली. या सादरीकरणातून मनोयात्रींच्या अंगी दडलेली कला, आत्मविश्वास व सकारात्मक ऊर्जा स्पष्टपणे जाणवली. उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाचे मनापासून कौतुक केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top