Mahabreaking

🔴 BREAKING
Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह

bullock cart race : मासरूळात रंगला शंकरपटाचा थरार, मायकल अन् राणा जोडी ठरली सर्वात वेगवान!

bullock cart race :  महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीची ओळख दर्शविणारा व बळीराजा, शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे शंकरपट आहे. खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ असून या खेळाला आपल्या भागात प्रोत्साहन देण्याचे काम आगामी काळातही सुरूच राहील, अशी ग्वाही शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांनी दिली.

bullock cart race

शंकरपट हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ – जालिंदर बुधवत

पंडित सावळे

मासरूळ : महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीची ओळख दर्शविणारा व बळीराजा, शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे शंकरपट आहे. खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ असून या खेळाला आपल्या भागात प्रोत्साहन देण्याचे काम आगामी काळातही सुरूच राहील, अशी ग्वाही शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत मौजे मासरूळ (ता. जि. बुलडाणा) येथे भव्य शंकर पटाचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व त्यांच्या सहकार्याने केले होते. या शंकरपटामुळे पंचक्रोशी, राज्यातून तसेच पर राज्यातून शेतकरी आपले बैल घेऊन या ठिकाणी आले. सुमारे २०० बैलजोड्या सहभागी झाल्या.

यावेळी जालिंदर बुधवत पुढे म्हणाले की, पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. शर्यतीमधील व्यावसायिक दृष्टिकोन वाढत असून बैलांची निगा राखणे, त्यांचे संगोपन करणे, अशी अनेक कामे तरुणाई स्वतः करीत असून बैलांच्या किमतीदेखील प्रचंड वाढू लागल्या आहेत. शेतीमातीशी एकनिष्ठ असलेल्या बांधवांसाठी हा खेळ मानाचा असल्याचेही जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले. बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर तथा प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या कल्पक आयोजनातून शंकरपटाचा थरार गेल्या तीन दिवस मासरूळ येथे रंगला होता. पंचक्रोशीतील मंडळी, शेतकऱ्यांसह खास करून तरुणाईचा जल्लोष यावेळी पाहायला मिळाला. आज अखेरच्या दिवशी जनरल गटामध्ये क्रमांक पहिला पैलवान ग्रुप रा.मेहकर येथील रॉकी व भीमा या जोडीने ( ५.४६ सेकंद ) पटकवला ,तसेच ड गटातील मनोहर चव्हाण रा.करोडि यांचा मायकल व राणा या जोडीने पहिला क्रमांक (५.३८ सेकंद) मिळवला. यावेळी अनिल नरोटे, लखन गाडेकर ,सुधाकर आघाव, नंदू कऱ्हाडे ,विजय इतवारे, गजानन धांडे व पंच कमिटीचे शंकर काटोले, बाळूभाऊ सपकाळ, विनोद शंकर, सुरेश भागवत, अशोक काळे ,ज्ञानेश्वर भगत ,प्रकाश सपकाळ, कृष्णा नागपुरे ,संतोष पाटील गुळवे, स्वामी पवार, समाधान शिनकर, संदीप कारंजकर ,विजय काळे, देविदास साळवे, भागवत गाढवे, राजू तायडे ,वैभव खोडकी, प्रवीण पवार तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमारे पाच लाख रुपयांच्या बक्षिसांची लूट झाली. यावेळी शर्यतीचा थरार नागरिकांनी अनुभवला.

हे आहेत विजेते…

*साधारण गट *..

प्रथम क्रमांक :
गणेश भराड पैलवान ग्रुप मेहकर व प्रशांत मोरे गुम्मी यांची रॉकी आणि भीमा बैल जोडी

द्वितीय क्रमांक : राजू चव्हाण लक्ष्मण नगर व चरण भाऊ यांची विराट आणि साई बैल जोडी

तृतीय क्रमांक : पैलवान ग्रुप मेहकर व कैलास राठोड कानफोडी यांची चिमण्या आणि मयूर बैल जोडी.

“ड गट “…

प्रथम क्रमांक : मनोहर चव्हाण करोडी व सोनू भवटे बदनापूर यांची मायकल आणि राणा बैल जोडी.

द्वितीय क्रमांक: विशाल कवाळ कवाळवाडी आणि प्रथमेश तायडे नांद्रा कोळी यांची साई आणि विराट बैल जोडी

तृतीय क्रमांक : योगेश गव्हाड तळेगाव व आशिष काळे साखरखेर्डा यांची बादल आणि पवन बैल जोडी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top