Mahabreaking

🔴 BREAKING
The thieves have crossed all limits :चोरट्यांची हद्दच झाली, शेततळ्यातील ताडपत्रीच केली लंपास ; जवळखेड शिवारातील घटना Sanghatan Srujan Abhiyan :‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पातुरात बैठक ; काँग्रेसच्या बळकटीसाठी मंथन Public Awareness Campaign  :प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेविषयी जनजागृती Three Gas Cylinders Explode :हॉटेलातील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट;  वृध्दासह दोन जण जखमी dead monkey :खिरपुरी येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याने खळबळ Bhim Jayanti Celebrated :मलकापूर पांग्रा येथे भीमजयंतीचा उत्साहात, जयभीमचा जयघोष The thieves have crossed all limits :चोरट्यांची हद्दच झाली, शेततळ्यातील ताडपत्रीच केली लंपास ; जवळखेड शिवारातील घटना Sanghatan Srujan Abhiyan :‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पातुरात बैठक ; काँग्रेसच्या बळकटीसाठी मंथन Public Awareness Campaign  :प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेविषयी जनजागृती Three Gas Cylinders Explode :हॉटेलातील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट;  वृध्दासह दोन जण जखमी dead monkey :खिरपुरी येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याने खळबळ Bhim Jayanti Celebrated :मलकापूर पांग्रा येथे भीमजयंतीचा उत्साहात, जयभीमचा जयघोष

Jalindar Budhwat : गुम्मी येथे कुस्त्यांची भव्य दंगल; शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांची पैलवानांच्या पाठीवर शाबासकीची थाप

Jalindar Budhwat :तालुक्यातील मासरूळ जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या गुम्मी येथे कुस्तीची जुनी व समृद्ध परंपरा जपली जात असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे कुस्त्यांची भव्य दंगल उत्साहात पार पडली. वडिलोपार्जित कुस्ती परंपरा लाभलेल्या या गावात आजही अनेक पिढ्यांपासून जातिवंत पैलवानांची परंपरा कायम आहे. येथील पैलवानांचे वडील, आजोबा, पंजोबा हे सर्व नामवंत मल्ल असल्याने गुम्मीचा आखाडा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

A grand wrestling tournament

पंडित सावळे

मासरूळ  : तालुक्यातील मासरूळ जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या गुम्मी येथे कुस्तीची जुनी व समृद्ध परंपरा जपली जात असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे कुस्त्यांची भव्य दंगल उत्साहात पार पडली. वडिलोपार्जित कुस्ती परंपरा लाभलेल्या या गावात आजही अनेक पिढ्यांपासून जातिवंत पैलवानांची परंपरा कायम आहे. येथील पैलवानांचे वडील, आजोबा, पंजोबा हे सर्व नामवंत मल्ल असल्याने गुम्मीचा आखाडा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

या कुस्ती दंगलीत राज्यातील विविध भागांतून नावाजलेले पैलवान सहभागी झाले होते. रंगलेल्या कुस्त्यांनी उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बुलढाणा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी कुस्तीच्या आखाड्याला भेट देत पैलवानांच्या पाठीवर शाबासकीची व कौतुकाची थाप दिली. कुस्ती परंपरा जपणाऱ्या गुम्मी गावाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी अनिल नरोटे, शिवसेना तालुका प्रमुख विजय इतवारे, गजानन धांडे, सरपंच पती नंदकिशोर हुंडीवाले, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, बीट जमादार सुनील सोनुने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुस्तीच्या या भव्य दंगलीमुळे गुम्मी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top