Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Atharva Kharche : मोताळ्याच्या अथर्व खर्चेची जागतिक झेप!

Atharva Kharche :  छत्रपती शिवाजी महाराजांवरील अपार श्रद्धा आणि कलात्मक प्रतिभेच्या जोरावर मोताळा तालुक्यातील युवक अथर्व सुनिल खर्चे याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने अथर्वने तब्बल ५०० कोऱ्या झेरॉक्स कागदांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य चारकोल प्रतिमा साकारली आहे. या प्रतिमेचा आकार सुमारे २० फुट बाय १० फुट इतका असून, वेगवेगळ्या कागदांवर रेखाटलेली ही प्रतिमा पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Atharva Kharche

५00 कोऱ्या झेरॉक्स कागदांवर २०×१० फुटांची शिवप्रतिमा; इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मोताळा : छत्रपती शिवाजी महाराजांवरील अपार श्रद्धा आणि कलात्मक प्रतिभेच्या जोरावर मोताळा तालुक्यातील युवक अथर्व सुनिल खर्चे याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने अथर्वने तब्बल ५०० कोऱ्या झेरॉक्स कागदांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य चारकोल प्रतिमा साकारली आहे. या प्रतिमेचा आकार सुमारे २० फुट बाय १० फुट इतका असून, वेगवेगळ्या कागदांवर रेखाटलेली ही प्रतिमा पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

या अनोख्या कलाकृतीची दखल थेट इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली असून, अथर्व खर्चे यांच्या नावाची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. याबद्दल त्यांना प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक कलाकृतीबाबतची सविस्तर माहिती अथर्वने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडेही पाठवली असून, त्याठिकाणी नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अथर्व सुनिल खर्चे हे मोताळा येथील वार्ड क्रमांक १७ येथील रहिवासी असून, त्यांचे वडील श्री. सुनिल किसन खर्चे आहेत. अथर्वने पुणे येथून बी.ई. (इंजिनिअरिंग) चे शिक्षण पूर्ण केले असून, पुढील उच्च शिक्षणासाठी परदेशात एम.एस. करण्याची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. अभियांत्रिकी शिक्षणासोबतच कला व चित्रकलेची आवड जपत, शिवरायांवरील श्रद्धेतून साकारलेली ही कलाकृती आज त्याच्या यशाचा नवा अध्याय ठरत आहे.

अथर्वच्या या यशामुळे मोताळा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक वाढला असून, युवकांमध्ये त्याच्या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे. “शिवरायांची प्रेरणा आणि सातत्याने केलेला सराव यामुळेच हे यश मिळाले,” अशी भावना अथर्व खर्चे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top