Mahabreaking

[breaking_news]

Jalindar Budhwat :हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जालिंदर बुधवत यांच्या पुढाकारातून मासरूळात रंगणार शंकरपटाचा थरार….

Jalindar Budhwat :हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जालिंदर बुधवत यांच्या पुढाकारातून मासरूळात रंगणार शंकरपटाचा थरार….

Jalindar Budhwat

भव्य रक्तदान शिबिर अन् कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

मासरुळ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मासरूळ तालुका बुलढाणा येथे भव्य शंकर पटचे आयोजन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. २४ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान तीन दिवस शंकरपटाचा थरार पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अनुभवता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यभरात नावाजलेल्या बैलजोड्या घेऊन शेतकरी या शंकरपटामध्ये सहभागी होतात.

सोबतच विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन बाळासाहेबांचे जयंती निमित्त करण्यात आले आहे. यंदाचे हे वर्ष बाळासाहेबांच्या जयंतीचे शताब्दी वर्ष आहे. २३ जानेवारीला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना सकाळी साडेआठ वाजता फळ वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर धाड नाका परिसरातील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन व खाऊ वाटप करण्यात येईल. सकाळी ९ ते दुपारी ३ मासरूळ येथेच बुलढाणा तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन होईल. दरम्यान शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, प्रवक्ता जयश्रीताई शेळके, आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर शिवसेना शाखा फलकाचे अनावरण आणि सायंकाळी सेवा संकल्प आश्रम पळसखेड येथे निराधार बांधवांसाठी स्नेहभोजन कार्यक्रम पार पडणार आहे.

Jalindar Budhwat

कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे : बुधवत

२३ जानेवारीला रक्तदान शिबिर आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे तसेच २४ तारखेला सकाळी तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. मासरूळात आयोजित शंकर पटाचा थरार अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top