Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

‘Mission Deletion :देऊळगाव राजात ‘मिशन निर्लेखन’ सुरू : धोकादायक वर्गखोल्यांबाबत गट विकास अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

‘Mission Deletion : वापरास अयोग्य, धोकादायक किंवा पूर्णतः जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांना अधिकृतरीत्या रद्द ठरविण्याची शासकीय प्रक्रिया म्हणजेच वर्गखोल्या निर्लेखन असल्याचे प्रतिपादन देऊळगाव राजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मुकेश माहोर यांनी केले. १७ जानेवारी रोजी आयोजित मुख्याध्यापकांच्या सभेत त्यांनी ‘मिशन निर्लेखन’ अंतर्गत सविस्तर मार्गदर्शन केले.

'Mission Deletion'

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : वापरास अयोग्य, धोकादायक किंवा पूर्णतः जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांना अधिकृतरीत्या रद्द ठरविण्याची शासकीय प्रक्रिया म्हणजेच वर्गखोल्या निर्लेखन असल्याचे प्रतिपादन देऊळगाव राजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मुकेश माहोर यांनी केले. १७ जानेवारी रोजी आयोजित मुख्याध्यापकांच्या सभेत त्यांनी ‘मिशन निर्लेखन’ अंतर्गत सविस्तर मार्गदर्शन केले.

वर्गखोल्या निर्लेखनाची कारणे :
खालील परिस्थितीत वर्गखोल्यांचे निर्लेखन करता येते—
इमारत अतिजीर्ण व पडझडीच्या अवस्थेत असणे, छप्पर व भिंतींना मोठ्या भेगा किंवा गळती असणे,
विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होणे. अशा वर्गखोल्यांचे निर्लेखन बांधकाम अभियंत्यासह संयुक्त स्थळपाहणी केल्यानंतर करता येते.

निर्लेखनासाठी आवश्यक कागदपत्रे :
शाळा प्रमुखांचा प्रस्ताव, पंचायत अभियंत्यांचा स्थळपाहणी अहवाल, आतील व बाहेरील फोटो पुरावे,
शाळा व्यवस्थापन समिती (SMC) चा ठराव, इमारतीची माहिती (बांधकाम वर्ष, खोल्यांची संख्या, क्षेत्रफळ),
गटशिक्षणाधिकाऱ्यांची शिफारस. या कागदपत्रांच्या आधारे नियमानुसार कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले.

वर्गखोल्यांचे निर्लेखन झाल्यानंतर शाळांना अनेक प्रशासकीय, शैक्षणिक व आर्थिक फायदे होतात. विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित होते, जीर्ण व धोकादायक खोल्यांचा वापर बंद होतो, अपघात व पडझडीचा धोका टळतो, शाळेची कायदेशीर जबाबदारी कमी होते. तसेच नवीन वर्गखोल्यांच्या मंजुरीचा मार्ग मोकळा होतो, आमदार व खासदार निधी उपलब्ध होऊ शकतो आणि शाळा बंद पडण्याचा धोका कमी होतो, असे गट विकास अधिकारी मुकेश माहोर यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top