Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Four sheep were crushed to death : भरधाव वाळूच्या टिप्परचा थरार : चार मेंढ्यांचा जागीच चेंदामेंदा

Four sheep were crushed to death : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर वाळू वाहतुकीने अक्षरशः हाहाकार माजवला असून वाळू माफियांची वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. यामुळे किरकोळ अपघातांची मालिका सुरू असतानाच सोमवारी एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली.

Four sheep were crushed to death

तरवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; वाळू माफियांच्या सुसाट वाहतुकीने नागरिकांत संताप

मोताळा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर वाळू वाहतुकीने अक्षरशः हाहाकार माजवला असून वाळू माफियांची वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. यामुळे किरकोळ अपघातांची मालिका सुरू असतानाच सोमवारी एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली.

आज दुपारी सुमारे बारा वाजता तरवाडी फाटा परिसरात सीमा गजानन शिंदे हे आपल्या शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी रस्त्यालगत जात असताना नांदूरा येथून मोताळ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूने भरलेल्या टिप्पर थेट मेंढ्यांच्या कळपात शिरला. या भीषण अपघातात चार मेंढ्यांचा जागीच चेंदामेंदा झाला.

या घटनेत मेंढपाळाचे अंदाजे ६० ते ७० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने मेंढपाळ बचावले असले, तरी वाळू माफियांच्या बेफिकीर वाहनचालकांमुळे नागरिकांसह जनावरांचेही जीव धोक्यात आले आहेत. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून महसूल व पोलीस प्रशासनाने मोकाट सुटलेल्या वाळू माफियांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, प्रशासन आता तरी या बेकायदेशीर वाळू वाहतुकीकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top