Mahabreaking

[breaking_news]

Shiv Sena’s strength :अंजनी बुद्रुकमध्ये शिवसेनेची ताकद वाढली : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत १०० जणांचा पक्षप्रवेश

Shiv Sena’s strength : शिवसेनेचे मुख्य नेते तथा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन अंजनी बुद्रुक येथील तब्बल १०० कार्यकर्त्यांनी केंद्रीय आयुष्य, आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यानिमित्त आयोजित पक्षप्रवेश व पदाधिकारी–कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला.

Shiv Sena's strength

मेहकर : शिवसेनेचे मुख्य नेते तथा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन अंजनी बुद्रुक येथील तब्बल १०० कार्यकर्त्यांनी केंद्रीय आयुष्य, आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यानिमित्त आयोजित पक्षप्रवेश व पदाधिकारी–कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला.
याच कार्यक्रमात मंत्री प्रतापराव जाधव व संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून अंजनी बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, शहरप्रमुख जयचंद बाठी, दिलीपराव देशमुख, बबनराव तुपे, समाधान साबळे, अरुण पोपळघट, सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण दळवी, विजय जागृत आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. सरपंच किरण पारिसकर, अरुण लाड, संतोष टोणपे, अरुण पिंपळे, विष्णू ढोले, बाबुराव नागोलकर, राम राऊत आदींनी अतिथींचा सत्कार केला. विनोद ढोले, गजानन नागुलकर, शिवम ढोले, अशोक नागोलकर, शंकर पायघन, विशाल लाड, गणेश लांडे यांच्यासह १०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, पीक विमा, लाडकी बहीण योजना व शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे कार्य सर्वसामान्यांसाठी लाभदायक ठरले आहे. मेहकर–लोणार तालुक्यात सुमारे ५ हजार कोटींची विकासकामे झाली असून अंजनी बुद्रुकमध्येच १२ कोटींची विकासकामे करण्यात आली आहेत. समाजात जातीय विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिवसैनिकांनी योग्य उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत शिवसेना–महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, वैनगंगा–नळगंगा–पैनगंगा नदीजोड प्रकल्पाचा सर्वे पूर्ण झाला असून सुमारे ८९ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील भाग सुजलाम–सुफलाम होणार आहे. खामगाव–जालना रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असून पुढील दोन वर्षांत हा मार्ग सुरू होईल. समृद्धी महामार्ग, राज्य महामार्गांचे जाळे व आयुष्यमानसह विविध आरोग्य योजनांमधून सरकार जनतेच्या हितासाठी काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र व राज्यात महायुतीची सत्ता असल्यामुळेच विकासकामे गतीने होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
कार्यक्रमाला अकोला ठाकरे येथील सरपंच बंडू ठाकरे, बाबुराव नागोलकर, डॉ. वसंत नागोलकर, गजानन तडस, संतोष टोणपे, अरुण पिंपळे, अरुण लाड, विष्णू वानखेडे, दत्ता पारसकर, रतन मानघाले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती सुरेश आढाव यांनी केले, तर आभार प्रदर्शन करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top