Mahabreaking

🔴 BREAKING
Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह

 police lathi-charge : छत्रपती संभाजीनगरात मतमोजणी केंद्राबाहेर तणाव; शिवसेना पदाधिकाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार!

police lathi-charge : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शासकीय तंत्रनिकेतन येथील मतमोजणी केंद्राबाहेर मोठा तणाव निर्माण झाला. मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्याच्या कारणावरून शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी व पोलिसांमध्ये वाद झाला. ओळखपत्र असूनही अडवले जात असल्याचा आरोप करीत उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. हा वाद चिघळताच पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना शुक्रवारी (१६ जानेवारी) सकाळी घडली.

police lathi-charge
शासकीय तंत्रनिकेतनसमोरील घटनेने खळबळ; माजी महापौरांसह चौघे जखमी

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शासकीय तंत्रनिकेतन येथील मतमोजणी केंद्राबाहेर मोठा तणाव निर्माण झाला. मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्याच्या कारणावरून शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी व पोलिसांमध्ये वाद झाला. ओळखपत्र असूनही अडवले जात असल्याचा आरोप करीत उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. हा वाद चिघळताच पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना शुक्रवारी (१६ जानेवारी) सकाळी घडली.

या लाठीमारात माजी महापौर विकास जैन यांच्यासह चार शिवसेना पदाधिकारी जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चार ठिकाणी मतमोजणी सुरू

शहरात एकूण चार मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे.

शासकीय तंत्रनिकेतन : प्रभाग क्रमांक १८, १९, २०, २१, २२, २७

गरवारे स्टेडियम : प्रभाग १, ७, ८, ९, १०, ११, २३, २४, २५

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय : प्रभाग १५, १६, १७, २६, २८, २९

सेंट फ्रान्सीस हायस्कूल : प्रभाग ३, ४, ५, ६, १२, १३, १४

यातील शासकीय तंत्रनिकेतन केंद्रासमोर प्रवेशाच्या मुद्द्यावरून झालेला वाद नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पालकमंत्र्यांची पोलिसांवर तीव्र टीका

घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मतमोजणी केंद्रावर धाव घेतली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार हेही घटनास्थळी दाखल झाले. पालकमंत्र्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत,
“प्रतिनिधींकडे ओळखपत्र असताना बळाचा वापर करणे म्हणजे शुद्ध मस्तवालपणा आहे. रस्त्यावर गर्दी व वाहतूक कोंडी असताना पोलिस बेफिकीरपणे मारहाण करतात, ही कसली कायदा-सुव्यवस्था?” असा सवाल उपस्थित केला.तसेच दोषी पोलीस अधिकारी देशमुख यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली.दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जखमी कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद साधत घटनेची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top