Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

MLA Manoj Kayande : थोर संतांचे विचार जनमानसात रुजणे गरजेचे – आमदार मनोज कायंदे

MLA Manoj Kayande : तालुक्यातील मेहुणा राजा येथील थोर संत चोखामेळा महाराज यांच्या ७५८ व्या जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसेच थोर संतांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार मनोज कायंदे यांनी केले.

MLA Manoj Kayande

संत चोखामेळा यांचा ७५८ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा

 

गजानन तिडके

देऊळगाव राजा  : तालुक्यातील मेहुणा राजा येथील थोर संत चोखामेळा महाराज यांच्या ७५८ व्या जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसेच थोर संतांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार मनोज कायंदे यांनी केले.

जन्मस्थळ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आमदार कायंदे

सकाळी पालखी सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार कायंदे म्हणाले की, मेहुणा राजा हे संतपीठांपैकी एक महत्त्वाचे स्थान असून संत चोखामेळा महाराज यांचे जन्मस्थळ म्हणून या गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या या स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.

यावेळी दुपारी आयोजित कार्यक्रमात माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, थोर संत व महापुरुषांच्या स्थळांच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी संत चोखामेळा जन्मोत्सव हा भविष्यात लोकोत्सव व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

MLA Manoj Kayande

सकाळी महापूजा, पालखी मिरवणूक व कीर्तन

संत चोखामेळा यांच्या ७५८ व्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता महापूजा आमदार मनोज कायंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर महाआरती व पालखी मिरवणूक गावातून काढण्यात आली. ग्रामस्थांनी घराघरांत रांगोळी काढून पालखीतील संत चोखामेळा महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. शाळकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्यात सहभाग घेतल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली. दुपारी स्वागत समारंभ, कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MLA Manoj Kayande

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी गटविकास अधिकारी मुकेश माहोर, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नाझेर काझी, केंद्रप्रमुख बबनराव कुमठे, सरपंच मंदाताई बोंद्रे, उपसरपंच साहेबराव काकडे, माजी जि.प. अध्यक्ष गंगाधर जाधव, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, टी.डी. सिपने, भगवान मुंडे, प्रा. दिलीप सानप, कमलेश खिल्लारे, प्रवीण गीते, प्रकाश गीते, बाबुराव नागरे, डॉ. सुनील कायंदे, गजानन काकड,विष्णू झोरे, प्रा. दिलीप झोटे, तुषार शिपणे, सुनील शेजुळकर, राजेंद्र इंगळे, गजानन पवार, रमेश कायंदे, रामदास मांटे यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य भाविक उपस्थित होते.

 

जिल्हा परिषद प्रशासनाकडून दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असले तरी तालुकास्तरीय पंचायत समिती वगळता इतर काही विभागांचे अधिकारी उपस्थित नसल्याने हा विषय उपस्थितांमध्ये चर्चेचा ठरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top