Mahabreaking

[breaking_news]

Chhatrapati Shivaji Vidyalaya  :जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी विद्यालयाची भव्य शोभायात्रा

Chhatrapati Shivaji Vidyalaya  : हिंदवी स्वराज्याची संकल्पना ज्या संस्कारांतून घडली त्या कर्तृत्ववान मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त दिनांक १२ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी विद्यालय, सिंदखेड लपाली येथील विद्यार्थ्यांनी भव्य व देखणी शोभायात्रा काढली. या शोभायात्रेत जिजामाता अश्वारूढ स्वरूपात सहभागी झाल्याने वातावरणात इतिहासाची जिवंत अनुभूती निर्माण झाली.

Chhatrapati Shivaji Vidyalaya

शिवकालीन मर्दानी खेळांसह लाठी-काठी, भाला, दांडपट्टा आणि लेझीम पथकाच्या थरारक प्रात्यक्षिकांनी जिंकली मने

मासरूळ : हिंदवी स्वराज्याची संकल्पना ज्या संस्कारांतून घडली त्या कर्तृत्ववान मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त दिनांक १२ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी विद्यालय, सिंदखेड लपाली येथील विद्यार्थ्यांनी भव्य व देखणी शोभायात्रा काढली. या शोभायात्रेत जिजामाता अश्वारूढ स्वरूपात सहभागी झाल्याने वातावरणात इतिहासाची जिवंत अनुभूती निर्माण झाली.

शोभायात्रेत लेझीम-ढोल पथक, शिवकालीन मर्दानी खेळ, लाठी-काठी, भाला, तलवार, दांडपट्टा आदी युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. गावातील चौकाचौकात लेझीम पथकाने लयबद्ध सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. ढोलाच्या गजरात सादर झालेल्या वीररसपूर्ण लेझीमने परिसरात चैतन्य निर्माण केले.

यासोबतच वारकरी संप्रदायाची दिंडी-पालखी, बाल वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, तालबद्ध पावली, फुगडी आदी पारंपरिक खेळ शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले. विद्यालयाच्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी परिधान केलेली नऊवारी पातळ आणि मराठमोळी वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी संस्थाध्यक्ष योगेंद्र गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम ग्रामस्थांच्या कौतुकास पात्र ठरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top