Mahabreaking

[breaking_news]

blood donation camp :रक्तदान शिबिरात ५१ युवकांचा सहभाग, जगद्गुरु रामानंदाचार्य संप्रदाय समितीचा उपक्रम

blood donation camp : येथे  दि. १० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिर जगद्‌गुरु रामानंदाचार्य संप्रदाय सिंदखेडराजा तालुका सेवा समितीच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरखेर्डा येथे आयोजित करण्यात आले होते.

blood donation

साखरखेर्डा :येथे  दि. १० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिर जगद्‌गुरु रामानंदाचार्य संप्रदाय सिंदखेडराजा तालुका सेवा समितीच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरखेर्डा येथे आयोजित करण्यात आले होते. सकाळी ९.०० वाजता सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांच्या शुभहस्ते व ठाणेदार गजानन करेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल परिहार, डॉ. प्रशांत भालेराव, माजी मुख्याध्यापक रमेश ठोसरे, माजी प्राचार्य डी. एन. पांचाळ, पत्रकार अशोक इंगळे, तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर दसरे, सेवाकेंद्र अध्यक्ष रामेश्वर दानवे, ब्लॅक कमांडो रमेश इंगळे, बबनराव मुदमाळी, ज्ञानेश्वर जैवळ, संजय नवले, तसेच महिला तालुका प्रमुख अनिताताई झोरे, कल्पनाताई दानवे, मंदाकिनीताई दसरे व ज्योतीताई इंगळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, या उदात्त हेतूने जगद्‌गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने दरवर्षीप्रमाणे यंदाही ४ जानेवारी ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत १५ दिवस चालणाऱ्या महाकुंभाद्वारे रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा महान उपक्रम जगद्‌गुरु रामानंदाचार्य संप्रदाय संस्थानतर्फे राबविला जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून संप्रदायाचे येथील प्रमुख पश्चिम विदर्भ उपपीठ शेगाव समितीचे सदस्य माजी प्राचार्य संतोष दसरे यांनी हे रक्तदान शिबिर आयोजित केले. या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी आपल्या मनोगतात ठाणेदार गजानन करेवाड म्हणाले की, या उपक्रमामागील मुख्य उद्देश रक्ताचा तुटवडा दूर करणे हा आहे. अपघातग्रस्त, गर्भवती माता, मायक्रोसाइटिक अ‍ॅनिमिया, सिकलसेल, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर अशा गंभीर आजारांशी झुंजणारे हजारो रुग्ण रक्ताच्या एका थेंबासाठी तडफडत असतात. अशा वेळी रक्तदातेच त्यांचे देवदूत ठरू शकतात. या गंभीर आजारांवरील उपचारासाठी आवश्यक रक्तसाठा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असून यामध्ये रक्तदात्यांचे योगदान मोलाचे आहे.

या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी व शेतकरी युवकांचा सहभाग होता.  यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र, अल्पोपहार (बिस्कीट) तसेच आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top