Mahabreaking

[breaking_news]

A grand blood donation camp : साखरखेर्डा येथे १० जानेवारी रोजी महाकुंभ रक्तदान शिबिराचे आयोजन

A grand blood donation camp : ४ ते १८ जानेवारीदरम्यान १५ दिवस चालणाऱ्या महाकुंभ रक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्त उपलब्ध करून देण्याचा हा महान सामाजिक उपक्रम जगद्गुरु रामानंदाचार्य संप्रदाय संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे.या अभियानाअंतर्गत सिंदखेडराजा तालुका संप्रदाय सेवा समितीच्या वतीने दि. १० जानेवारी रोजी साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

A grand blood donation camp

साखरखेर्डा  : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, या उदात्त हेतूने जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणेने दरवर्षीप्रमाणे यंदाही ४ ते १८ जानेवारीदरम्यान १५ दिवस चालणाऱ्या महाकुंभ रक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्त उपलब्ध करून देण्याचा हा महान सामाजिक उपक्रम जगद्गुरु रामानंदाचार्य संप्रदाय संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे.

या अभियानाअंतर्गत सिंदखेडराजा तालुका संप्रदाय सेवा समितीच्या वतीने दि. १० जानेवारी रोजी साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे रक्ताचा तुटवडा दूर करणे. अपघातग्रस्त रुग्ण, गर्भवती माता, मायक्रोसाइटिक अ‍ॅनिमिया, सिकलसेल, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी आजार यांसारख्या गंभीर आजारांशी झुंज देणारे हजारो रुग्ण आज रक्ताच्या एका थेंबासाठी तडफडत असतात. अशा वेळी रक्तदाता हा त्यांच्या आयुष्यातील खरा देवदूत ठरतो. केवळ पाच मिनिटांचे रक्तदान एखाद्याच्या संपूर्ण आयुष्याचे रक्षण करू शकते, हीच या उपक्रमाची भावना आहे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे रक्ताची गरज दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक सुजाण नागरिकाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासाठी पुढे येणे अत्यंत आवश्यक झाले आहे. रक्तदान प्रक्रियेदरम्यान सर्व वैद्यकीय निकष व सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, अनुभवी डॉक्टर व प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र, अल्पोपहार तसेच आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

या सामाजिक उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पश्चिम विदर्भ उपपीठ शेगाव समितीचे सदस्य संतोषराव दसरे, तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर दसरे, सेवा केंद्र अध्यक्ष रामेश्वर दानवे, रमेश इंगळे व बबन मुदमाळी यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top