Mahabreaking

[breaking_news]

Vidya Gulabchand Chavare :विद्या गुलाबचंद चवरे यांच्या व्हिडीओची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड; विभागस्तरावर प्रथम क्रमांक

Vidya Gulabchand Chavare : शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डाएटमधील अधिकारी-कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील पर्यवेक्षीय यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक व प्रशासनिक कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने तालुका, विभाग व राज्यस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Vidya Gulabchand Chavare

बुलढाणा : शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डाएटमधील अधिकारी-कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील पर्यवेक्षीय यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक व प्रशासनिक कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने तालुका, विभाग व राज्यस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धांच्या माध्यमातून शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकता वाढविण्याबरोबरच त्यांची डिजिटल, भाषिक व सादरीकरण कौशल्ये अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.

या अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), बुलढाणा येथे दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी विभागस्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, देवपूर (ता. बुलढाणा) येथील सहाय्यक शिक्षिका कु. विद्या गुलाबचंद चवरे यांनी सादर केलेल्या व्हिडीओने प्रथम क्रमांक पटकावला.

त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत सदर व्हिडीओची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, ही बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top