Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Hidayat Patel :काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या

Hidayat Patel : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवार, 6 जानेवारी रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान, 07 जानेवारी रोजी सायंकाळी शोकाकुल वातावरणात हिदायत पटेल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Hidayat Patel

अकोला जिल्हा हादरला; मशिदीत नमाजादरम्यान धारदार शस्त्राने छातीवर वार, आरोपी अटकेत

अकोट : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवार, 6 जानेवारी रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान, 07 जानेवारी रोजी सायंकाळी शोकाकुल वातावरणात हिदायत पटेल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अकोट तालुक्यातील मोहाळा येथील मशिदीत हिदायत पटेल हे मंगळवारी नमाज पठणासाठी गेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. छातीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत मशिदीतून बाहेर आले. उपस्थितांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात हलविले; मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपीला पणज येथून ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

घटनेनंतर मोहाळा व अकोट शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पाटील, शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमोल माळवे तसेच ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर जुंगरे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पूर्ववैमनस्याची पार्श्वभूमी

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर २४ मे २०१९ रोजी मोहाळा येथे भाजपा अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी मतीन खाँ शेर खाँ पटेल यांची हत्या झाली होती. या प्रकरणी मुमताज खाँ यांच्या फिर्यादीवरून हिदायतउल्ला खाँ बरकतउल्ला खाँ पटेल यांच्यासह १० जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच हिदायत पटेल यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाल्याने या घटनेला पूर्ववैमनस्याची किनार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे प्रशासनापुढे मोठे आव्हान ठरले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top