Police route march : आगामी धम्मचक्र प्रवर्तन दिन व दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रूट मार्च काढण्यात आला.

बार्शीटाकळी :आगामी धम्मचक्र प्रवर्तन दिन व दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रूट मार्च काढण्यात आला.
अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तीजापूर यांच्या आदेशानुसार, तर बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली २७ सप्टेंबर रोजी कान्हेरी सरप व बार्शीटाकळी शहरात हा रूट मार्च पार पडला.
दुर्गादेवी विसर्जनावेळी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता अबाधित रहावी व धार्मिक उत्सव सुरळीत पार पडावा, यासाठी समाजबांधव, विविध समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शांतता व सुव्यवस्थेसाठी जनजागृती मोहिमाही राबविण्यात आली. या रूट मार्चमध्ये पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

