strongly condemn :मध्यप्रदेशातील ग्वालियर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाळून विटंबना केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत वंचित बहुजन युवा आघाडी, बाळापुर तालुक्याच्या वतीने बाळापुर पोलिस स्टेशन व उरळ पोलिस स्टेशन येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.

वंचित बहुजन युवा आघाडी बाळापुर तालुक्याच्या वतीने पोलिसांत तक्रार; अन्यथा आंदोलनाचा इशारा
राहुल सोनोने
वाडेगाव : मध्यप्रदेशातील ग्वालियर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाळून विटंबना केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत वंचित बहुजन युवा आघाडी, बाळापुर तालुक्याच्या वतीने बाळापुर पोलिस स्टेशन व उरळ पोलिस स्टेशन येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.
या संतापजनक घटनेमुळे सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा संपूर्ण बहुजन समाजाचा अपमान असल्याचे मत वंचित बहुजन युवा आघाडीने व्यक्त केले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तक्रार दाखल करताना वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सुगत डोंगरे, तालुका उपाध्यक्ष अमोल वानखडे, तालुका सचिव निशिकांत सदार, तालुका सचिव हिम्मत सिरसाट, तसेच युवराज डोंगरे, जयवर्धन डोंगरे, दिलीप वानखडे, धनराज चोरे, प्रतिक मोरे, जगदेव सिरसाट, अंकुश इंगळे यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनाद्वारे प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला असून, या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी, बाळापुर तालुक्याच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

