Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

A golden opportunity for pediatricians :विदर्भातील बालरोगतज्ज्ञांसाठी पर्वणी; शेगावात उद्यापासून ‘विदर्भ पेडिकॉन–२०२६’ भव्य शैक्षणिक परिषद

A golden opportunity for pediatricians : विदर्भातील बालरोगतज्ज्ञांसाठी अत्यंत महत्त्वाची व प्रतिक्षित असलेली ‘विदर्भ पेडिकॉन–२०२६’ ही भव्य शैक्षणिक परिषद येत्या ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी शेगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथील अत्याधुनिक सभागृहात संपन्न होणार असून, विदर्भासह महाराष्ट्र, देशातील विविध राज्यांमधून तसेच राष्ट्रीय पातळीवरील नामांकित बालरोगतज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

A golden opportunity for pediatricians in Vidarbha

दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
शेगाव (जि. बुलढाणा) : विदर्भातील बालरोगतज्ज्ञांसाठी अत्यंत महत्त्वाची व प्रतिक्षित असलेली ‘विदर्भ पेडिकॉन–२०२६’ ही भव्य शैक्षणिक परिषद येत्या ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी शेगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथील अत्याधुनिक सभागृहात संपन्न होणार असून, विदर्भासह महाराष्ट्र, देशातील विविध राज्यांमधून तसेच राष्ट्रीय पातळीवरील नामांकित बालरोगतज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
ही परिषद Academy of Pediatrics (AOP) खामगाव, AOP बुलढाणा आणि विदर्भ पेडियाट्रिक असोसिएशन (VPA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील बालरोगतज्ज्ञांना अद्ययावत वैद्यकीय ज्ञान, आधुनिक उपचारपद्धती, संशोधन आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी ही परिषद एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.

बालरोग उपचारांवरील सखोल चर्चा
परिषदेचा मुख्य उद्देश बालरोग विषयातील मूलभूत संकल्पना, नवीन मार्गदर्शक तत्त्वे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच ग्रामीण व निमशहरी भागातील बालरोग उपचारांतील आव्हाने यावर सखोल चर्चा करणे हा आहे. परिषदेत शास्त्रीय सत्रे, पॅनल चर्चा, कार्यशाळा, पोस्टर व पेपर सादरीकरण, पेडीक्विझ तसेच विशेष शैक्षणिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ नवोदित तसेच अनुभवी बालरोगतज्ज्ञांना होणार आहे.

A golden opportunity for pediatricians

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन

परिषदेचा भव्य उद्घाटन समारंभ शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या सोहळ्यास मा. श्री. प्रतापरावजी जाधव, केंद्रीय आयुष व आरोग्य मंत्री, मा. श्री. आकाशदादा पांडुरंग फुंडकर, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री,मा. श्री. संजयजी कुटे, आमदार, जळगाव जामोद, मा. श्री. रामदादा पाटील, मुख्य कार्यकारी संचालक, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव, डॉ. उदय बोधनकर (मुख्य संरक्षक), डॉ. वसंत खळतकर, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, डॉ. विन्की रुघवानी, मानद प्रशासक, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शैक्षणिकतेसोबत सामाजिक उपक्रम

या परिषदेनिमित्त सीपीआर जनजागृती कार्यशाळा, ‘आरोग्यदायी भविष्यासाठी पावले’ वॉकथॉन, तसेच स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणिकतेसोबत सामाजिक जबाबदारीचाही संदेश दिला जाणार आहे.

कोअर ऑर्गनायझिंग कमिटीचे योगदान

या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी कोअर ऑर्गनायझिंग कमिटीने विशेष मेहनत घेतली आहे. डॉ. राजेश सराफ – आयोजन अध्यक्ष, डॉ. सुभाष खरड – आयोजन अध्यक्ष, डॉ. सतीश तिवारी – अध्यक्ष, VPA, डॉ. संदीप दानखडे – सचिव, VPA, डॉ. सचिन पाटील – खजिनदार, VPA, डॉ. सतीश अग्रवाल – संयोजक, VPA, डॉ. अमित देशमुख – अध्यक्ष, AOP खामगाव, डॉ. गुरु प्रसाद थेटे – सचिव, AOP खामगाव, डॉ. हेमंत बंदे – खजिनदार, AOP खामगाव, डॉ. योगेश शेवाळे – अध्यक्ष, AOP बुलढाणा, डॉ. अक्षय हिरे – सचिव, AOP बुलढाणा, डॉ. प्रदीप खार्डे – खजिनदार, AOP बुलढाणा, यासह AOP खामगाव व AOP बुलढाणाचे सर्व पदाधिकारी, उपसमिती सदस्य व स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत.

‘विदर्भ पेडिकॉन–२०२६’ ही परिषद केवळ शैक्षणिक मेळावा न राहता, विदर्भातील बालरोग सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे, अशी माहिती डॉ. गुरु प्रसाद थेटे व डॉ. योगेश शेवाळे (आयोजन सचिव) यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top