Mahabreaking

[breaking_news]

SDPO Manisha Kadam :व्यसनाधीनतेकडे तरुणाईचा वाढता कल धोकादायक; युवा पिढीस घातक : एसडीपीओ मनीषा कदम

SDPO Manisha Kadam :आजच्या विज्ञानयुगात मानव झपाट्याने प्रगती करत असला, तरी दुसरीकडे उद्याचे भविष्य असलेली नवयुवक पिढी वेगाने व्यसनाधीनतेकडे वळत असल्याचे चित्र चिंताजनक आहे. ही बाब भविष्यातील पिढीसाठी अत्यंत धोकादायक व घातक असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी ३१ डिसेंबरनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

SDPO Manisha Kadam

गजानन तिडके

देऊळगाव राजा : आजच्या विज्ञानयुगात मानव झपाट्याने प्रगती करत असला, तरी दुसरीकडे उद्याचे भविष्य असलेली नवयुवक पिढी वेगाने व्यसनाधीनतेकडे वळत असल्याचे चित्र चिंताजनक आहे. ही बाब भविष्यातील पिढीसाठी अत्यंत धोकादायक व घातक असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी ३१ डिसेंबरनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

पोलीस उपविभागीय कार्यालय, आधार व्यसनमुक्ती केंद्र आणि देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ डिसेंबरच्या रात्री देऊळगाव राजा येथे व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य व सजग जीवनशैलीच्या प्रचारासाठी समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “दारू नको, दूध घ्या” हा संदेश समाजात रुजवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मनीषा कदम यांनी सांगितले की, सध्याच्या पोलीस नोंदींनुसार कौटुंबिक हिंसाचार, पती-पत्नीतील वाद, युवकांमधील वाढते गुन्हेगारी प्रकार यामागे व्यसनाधीनता हे मुख्य कारण ठरत आहे. व्यसनासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी युवक गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असून, ही बाब येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत घातक आहे. व्यसन करणाऱ्यांना कोणतेही निमित्त पुरेसे ठरते—लग्नकार्य, मित्राचा वाढदिवस, तणाव अशा कारणांखाली तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या दैनंदिन सवयींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. लहान वयातच मोबाईलचे व्यसन जडल्याने विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमातील प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनीही युवक व पालकांना मार्गदर्शन करताना शालेय वयातील विद्यार्थ्यांकडून मेडिकलवरील स्टिक फास्ट, कफ सिरप, फेविकॉल यांसारख्या आरोग्यास अत्यंत घातक पदार्थांचा गैरवापर व्यसनासाठी केला जात असल्याची बाब गंभीर असल्याचे सांगितले. अशा वेळी सुजाण नागरिकांनी व मेडिकल व्यावसायिकांनी अशा पदार्थांची विक्री टाळावी, अथवा संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमानिमित्त स्थानिक बसस्थानक चौकात मोफत दूध वितरण करण्यात आले. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला असून, अनेक पालक व युवकांनी सहभाग नोंदवून व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प केला. युवक व नागरिकांना व्यसनाधीनतेपासून परावृत्त करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमास याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, देऊळगाव राजा पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी, आधार व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. विलास कोल्हे, डॉ. सौ. काजल कोल्हे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके, सचिव सुरज गुप्ता, उपाध्यक्ष मंगेश तिडके, डॉ. शिवाजी वाघ, अशोक जोशी, प्रभाकर मांटे, डॉ. उमेश मुंडे, डॉ. अमोल कोल्हे, डॉ. सुनील कायंदे, डॉ. कार्तिक कोल्हे, डॉ. नितीन मुंडे, राजू खांडेभराड, किरण वाघ, उषा डोंगरे, मुन्ना ठाकूर, मुबारक शहा, अमोल हरणे, संतोष वासुंबे, परमेश्वर खांडेभराड, दत्ता हांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top