Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Operation ‘Prahar :ऑपरेशन ‘प्रहार’ अंतर्गत दोन जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई;११ आरोपी ताब्यात

Operation ‘Prahar :  पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा (रेड) टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ११ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून १,११,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Operation 'Prahar',

बोरगाव मंजू पोलीस ठाण्यांतर्गंत धाड; १ लाख ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बोरगाव मंजू :   पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा (रेड) टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ११ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ,११,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग्राम दहीगाव गावंडे येथील पुरुषोत्तम गावंडे यांच्या शेतालगत काटनाच्या झाडाखालील खुल्या सार्वजनिक जागेत चरळी मटक्यावर पैशांची हार–जीत लावून जुगार खेळला जात असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. तेथे पथकाने नऊ जणांना ताब्यात घेतले तर एक जण तेथून पसार झाला. यावेळी पोलिसांनी दिपक रामकृष्ण मेश्राम (वय ४४),
महेश बंडू काटोले (वय २६), उमेश विनायक वानखडे (वय ४०),मोहत तामोदर वानखडे (वय २४),

बुद्धभूषण सुनील चोटमल (वय २१), गुलाम इरशाद गुलाम अब्बास (वय २७),मिलिंद भाऊराव गवई (वय २४),रोहित दशरथ वानखडे (वय २१), धर्मराज भीमराव खंदारे (वय २७) आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच  रामेश्वर माणिकराव काटोले (रा. दहीगाव गावंडे) हा पसार झाला.

यावेळी पोलिसांनी रोख रक्कम : ₹८,०५०, मोबाईल फोन : ५ (अंदाजे ₹५०,०००/-) कॅलक्युलेटर : ९ (अंदाजे ₹९००/-), वरली मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या/पुस्तके असा ५८ हजार ९५० रुपयांचा एवज जप्त करण्यात आला.

दुसरी कारवाई बस स्टँड चौक, बोरगाव मंजू येथे करण्यात आली. येथे “फन एशिया” वेबसाईटद्वारे एलसीडी/एलईडी टीव्ही स्क्रीनवर ० ते ९ आकड्यांवर पैशांची हार–जीत लावून जुगार खेळवला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला.यावेळी पोलिसांनी राजू मधुकर जाधव (वय २६, रा. अमडापूर, ता. चिखली, जि. बुलढाणा – सध्या रा. तेलीपुरा, बोरगाव मंजू), आशिष चंदूलाल कनौजिया (वय ३२, रा. तेलीपुरा, बोरगाव मंजू) यांना ताब्यात घेले तर मुख्य मालक सागर तायडे हा फरार झाला. यावेळी पोलिसांनी रोख रक्कम : ₹४५,५३०, एलसीडी/एलईडी टीव्ही स्क्रीन : ₹३०,०००, सीपीयू, की-बोर्ड, माऊस, पॉवर केबल व इतर साहित्य : ₹२०,००० असा ५३ हजार ५३०रुपयांचा एवज जप्त केला.

दोन्ही प्रकरणांमध्ये एकूण ११ आरोपी ताब्यात, १,११,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ व ५ अन्वये बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक   अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक   बी. चंद्रकांत रेड्डी व पोलीस निरीक्षक   शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली PSI गोपाल जाधव, GPSI दशरथ बोरकर,हेड कॉन्स्टेबल सुलतान पठाण, भास्कर थोत्रे, महेंद्र मलिये, पोलीस कॉन्स्टेबल अन्सार अहमद, स्वप्निल खेडकर, स्वप्निल चौधरी, उदय शुक्ला, चालक मनीष ठाकरे व रामकिसन डोईफोडे (स्थानिक गुन्हे शाखा, अकोला) यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top