Mahabreaking

🔴 BREAKING
Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Dr. Deepak Bhagat :डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर Leopard attack :शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वानराचा बळी, शेतकऱ्यांत घबराट Smoke and flames create :धूर आणि ज्वाळांनी महामार्गावर खळबळ; वाहनचालकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली Azim Nawaz Rahi :अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Dr. Deepak Bhagat :डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर Leopard attack :शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वानराचा बळी, शेतकऱ्यांत घबराट Smoke and flames create :धूर आणि ज्वाळांनी महामार्गावर खळबळ; वाहनचालकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली Azim Nawaz Rahi :अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त

Ranganath Guruji Parbhanikar : रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

Ranganath Guruji Parbhanikar : रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

Ranganath Guruji Parbhanikar,

देऊळगाव राजा : संत गजानन महाराज मंदिर, कुंभारी परिसर, देऊळगाव राजा येथे रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवर्य ह.भ.प. डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. भक्तीमय व उत्साही वातावरणात या सप्ताहाची सांगता करण्यात आली.

दिनांक ९ ते १६ डिसेंबर दरम्यान फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवर्य ह.भ.प. डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांच्या सुमधुर वाणीतील श्रीमद् भागवत कथा भाविकांसाठी पर्वणी ठरली. शहरातून पुष्पहारांनी सजवलेल्या रथातून वाजत-गाजत भजनी मंडळ, टाळकरी, वारकरी व भक्तगणांच्या उपस्थितीत गुरुवर्य भगवानबाबा आनंदगडकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर भागवत कथेची सांगता झाली.

अखंड हरिनाम सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा, काकडा भजन, विष्णुसहस्रनाम, हरिपाठ तसेच दररोज सायंकाळी हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. हरिकीर्तन सेवेमध्ये ह.भ.प. चंद्रकांत महाराज गुंजकर, ह.भ.प. निकम महाराज गुरुजी, ह.भ.प. आचार्य योगेश महाराज पाचपोर, ह.भ.प. ॲड. चिंदबरेश्वर महाराज साखरे, ह.भ.प. भीमाशंकर गुरुजी, ह.भ.प. भगवान महाराज वरवंड, ह.भ.प. उमेश महाराज भाकरे (जोग संस्था) यांची कीर्तनसेवा लाभली. काल्याचे कीर्तन ह.भ.प. डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांनी केले. यावेळी पंचक्रोशीतील टाळकरी, वारकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सद्गुरु जोग महाराज परंपरेनुसार हा अखंड हरिनाम सप्ताह गुरुवर्य ह.भ.प. डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांच्या आशीर्वादाने तसेच ह.भ.प. लक्ष्मण महाराज आंबोरे, ह.भ.प. प्रवीण सपाटे (प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, सिंदखेडराजा), ह.भ.प. पांडुरंग गुरुजी वाघ महाराज (पांगरी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

या सप्ताहासाठी ह.भ.प. निकम गुरुजी, ह.भ.प. जनार्दन कोल्हे, गणेश खरात, दिगंबर कोल्हे, ह.भ.प. सपकाळ महाराज, रामेश्वर कोल्हे, ह.भ.प. अनिल महाराज सपाटे, दीपक सपाटे, सुरज गुप्ता तसेच समस्त भक्तगणांचे विशेष सहकार्य लाभले. संत गजानन महाराज मंदिर संस्थान कुंभारी तसेच भिगाव, तुळजापूर, पिंपळगाव, चिलमखाँ, पांगरी, माळी शिराळा, गोळेगाव, कुंभारी व देऊळगाव राजा येथील टाळकरी, वारकरी, महिला भजनी मंडळ व दररोजचे अन्नदाते यांनी अथक परिश्रम घेतले.आमदार मनोज कायंदे व सतीश कायंदे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिभावात सांगता झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top