Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

‘Vigyanvedh’ program :‘विज्ञानवेध’ अंतर्गत ३१ विद्यार्थ्यांचा इस्रो व दक्षिण भारत शैक्षणिक दौरा

‘Vigyanvedh’ program : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नाविन्यपूर्ण उपक्रम – विज्ञानवेध’ कार्यक्रमांतर्गत निवड चाचणीद्वारे निवडलेल्या जिल्ह्यातील ३१ गुणवंत विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), बेंगलोर तसेच दक्षिण भारतातील विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांच्या भेटींचा विशेष शैक्षणिक दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पथकास 15 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात रवाना करण्यात आले.

'Vigyanvedh' program

जिल्हा वार्षिक योजना : जिल्हाधिकारी व सीईओ यांच्या हस्ते हिरवी झेंडी

अकोला : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नाविन्यपूर्ण उपक्रम – विज्ञानवेध’ कार्यक्रमांतर्गत निवड चाचणीद्वारे निवडलेल्या जिल्ह्यातील ३१ गुणवंत विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), बेंगलोर तसेच दक्षिण भारतातील विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांच्या भेटींचा विशेष शैक्षणिक दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पथकास 15 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात रवाना करण्यात आले.

सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्रीमती अनिता मेश्राम यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पथकाला शुभेच्छांसह निरोप देण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार उपस्थित होते.

या दौऱ्यासाठी निवडलेल्या ३१ विद्यार्थ्यांना विमानाने बेंगलोर येथे नेण्यात येणार असून, १५ ते २१ डिसेंबर या कालावधीत हा शैक्षणिक दौरा होणार आहे. दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांना इस्रोच्या अत्याधुनिक सुविधा पाहण्याची तसेच अंतराळ विज्ञानाविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच दक्षिण भारतातील ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण ज्ञानात भर घालण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

हा दौरा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्रीमती मीना व सीईओ श्रीमती मेश्राम यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी दोन विस्तार अधिकारी, एक वैद्यकीय अधिकारी व दोन शिक्षकांचे पथक विद्यार्थ्यांसोबत रवाना झाले आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रोशनी बंसल उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांमध्ये या दौऱ्याबाबत प्रचंड उत्साह दिसून आला, तसेच पालकांचाही उत्साह लक्षणीय होता. कार्यक्रमास विविध संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top