Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Deulgaon Raja…: सर्वपक्षीय नेत्यांच्या नजरा आता देऊळगाव राजाकडे…

Deulgaon Raja…: न्यायालयीन प्रक्रियेमुळे अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली नगरपालिका निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश येताच नेत्यांसह उमेदवारांची धावपळ वाढली आहे.देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक इतिहासात प्रथमच मतदारसंघातील आजी-माजी नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे जिल्ह्यासह राज्यस्तरीय नेत्यांच्या नजरा येथील पालिका निवडणुकीकडे लागल्या आहेत. कधीकाळी एकहाती सत्ता असलेल्या नेत्यांना यावेळी प्रतिस्पर्धी नेत्यांशी हातमिळवणी करून आघाडी करावी लागल्याने शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Deulgaon Raja…
‘आपलाच विजय’चा दावा; मात्र विकासाचा जाहीरनामा नाही

गजानन तिडके

देऊळगाव राजा :
न्यायालयीन प्रक्रियेमुळे अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली नगरपालिका निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश येताच नेत्यांसह उमेदवारांची धावपळ वाढली आहे.देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक इतिहासात प्रथमच मतदारसंघातील आजी-माजी नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे जिल्ह्यासह राज्यस्तरीय नेत्यांच्या नजरा येथील पालिका निवडणुकीकडे लागल्या आहेत. कधीकाळी एकहाती सत्ता असलेल्या नेत्यांना यावेळी प्रतिस्पर्धी नेत्यांशी हातमिळवणी करून आघाडी करावी लागल्याने शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे पार पडल्या. आजी-माजी नेत्यांनी गल्लीबोळ पिंजून काढत ‘आम्हीच श्रेष्ठ’ हे सामान्य मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कालावधीसाठी प्रचाराला विराम मिळाल्याने आता १२ तारखेपासून निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यामुळे उमेदवारांची चांगलीच घालमेल होत असल्याचे चित्र आहे. पूर्वीच्या घटनांकडे मतदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत असल्याने, सर्व यंत्रणा पुन्हा नव्याने कार्यान्वित कराव्या लागत असून उमेदवारांचे अर्थचक्र कोलमडल्याचे जाणवत आहे.

कालावधी वाढला, पण खर्च तोच कायम?
न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली असली, तरी उमेदवारांचा खर्च मात्र तोच कायम असल्याचे निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रभाग व नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी आतापर्यंत केलेला खर्च आणि येत्या सात ते आठ दिवसांत होणारा खर्च याचे गणित कसे जुळवायचे, हा प्रश्न उमेदवारांसमोर उभा आहे.

निवडणूक काही तासांवर येऊन ठेपलेली असताना नगराध्यक्ष व प्रभागातील सर्वच उमेदवारांनी खर्चाच्या बाबतीत हात सैल केला होता. नगराध्यक्ष पदासाठी साडेसात लाख रुपये, तर नगरसेवक पदासाठी अडीच लाख रुपयांची खर्च मर्यादा निवडणूक विभागाने निश्चित केली असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यासंदर्भात अद्याप कोणताही सुधारित अध्यादेश प्राप्त झालेला नसल्याचे स्थानिक निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

अधिवेशन आणि निवडणूक प्रक्रिया
जिल्ह्यात काही तुरळक भाग वगळता बहुतांश नगरपालिका निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, निवडणूक निकाल एकाच वेळी जाहीर होणार असल्याने नेत्यांसाठी राजकीय गणित मांडणे अवघड झाले आहे. एकीकडे नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, दुसरीकडे देऊळगाव राजा पालिका निवडणूकही तितकीच महत्त्वाची ठरत आहे.

येथील विविध आघाड्या व युती असल्या, तरी स्थानिक आजी-माजी नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने राज्यस्तरीय नेत्यांना येथे सभा घेण्यासाठी धाव घ्यावी लागत आहे. अतिरिक्त सभा झाल्यास उमेदवारांवर आर्थिक ओझे अधिक वाढणार असल्याने, उमेदवारांची ‘नाकी नऊ’ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिवेशन काळातच वरिष्ठ नेत्यांना येथे यावे लागणार असल्याने, त्यांच्या समोरही दुहेरी अडचण उभी ठाकल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top