found dead : तालुक्यातील ग्राम माळराजुरा येथील मागील दोन ते तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी, १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी गावालगतच्या तलावात पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृतदेह आढळताच गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी मृतकाचा चुलत भाऊ महादेव अंभोरे यांच्या फिर्यादीवरून पातूर पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून, घटनेमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

माळराजुरा तलावात बुडून मृत्यू : पोलिसांनी केली अकस्मिक मृत्यूंची नोंद
पातूर : तालुक्यातील ग्राम माळराजुरा येथील मागील दोन ते तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी, १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी गावालगतच्या तलावात पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृतदेह आढळताच गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी मृतकाचा चुलत भाऊ महादेव अंभोरे यांच्या फिर्यादीवरून पातूर पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून, घटनेमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
पातूर पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, माळराजुरा येथील ज्ञानेश्वर उत्तम अंभोरे (वय २५) हा युवक ९ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता घरातून बाहेर गेला होता. मात्र, तो परत न आल्याने त्याचा चुलत भाऊ महादेव अंभोरे यांनी १० डिसेंबर रोजी पातूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.
दरम्यान, नातेवाइकांकडून युवकाचा शोध सुरू असताना, १२ डिसेंबर रोजी सकाळी माळराजुरा गावालगत शेताजवळील तलावात पाण्यावर एक मृतदेह तरंगताना दिसून आला. कपड्यांवरून हा मृतदेह चुलत भावाचाच असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने कुटुंबीयांना माहिती दिली. पुढील तपासात हा मृतदेह ज्ञानेश्वर उत्तम अंभोरे (वय २५) याचाच असल्याचे निष्पन्न झाले.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गजानन तडसे व निखिल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविले.या प्रकरणी फिर्यादी महादेव गजानन अंभोरे यांच्या तक्रारीवरून पातूर पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक ४३/२०२५, कलम १९४ भादंवि (बीएनएस) प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

