Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

summer sesame : उन्हाळी तिळाच्या प्रमाणित बियाण्यांसाठी १०० टक्के अनुदान

summer sesame : तेलबिया उत्पादन वाढवून देशाचा खाद्यतेल आयातीवरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खाद्य तेल अभियान – तेलबिया गळीतधान्य (२०२५-२६) अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी तिळ पिकासाठी १००% अनुदानावर प्रमाणित बियाणे मिळणार आहेत. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा मनोजकुमार ढगे यांनी शेतकऱ्यांना यासाठी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

summer sesame

 शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन; राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत संधी

बुलढाणा : तेलबिया उत्पादन वाढवून देशाचा खाद्यतेल आयातीवरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खाद्य तेल अभियान – तेलबिया गळीतधान्य (२०२५-२६) अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी तिळ पिकासाठी १००% अनुदानावर प्रमाणित बियाणे मिळणार आहेत. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा मनोजकुमार ढगे यांनी शेतकऱ्यांना यासाठी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

अनुदानाच्या महत्त्वाच्या बाबी

  • उन्हाळी हंगाम २०२५ साठी तिळ बियाणे उपलब्ध
  • प्रमाणित बियाणे — हेक्टरी २.५ किलो
  • रक्कम : रु. १९७ प्रति किलो
  • बियाणे १००% केंद्र शासन अनुदानावर
  • किमान ०.२० हेक्टर — कमाल १ हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ
  • पॅकिंग साईजनुसार जादा बियाणे लागल्यास अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांनी भरणे आवश्यक

 अर्ज कसा करावा?

शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळावर लॉगइन करावे :
 https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

या पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण – पिक प्रात्यक्षिके – औषधे – खते या टाईलमध्ये तिळाच्या बियाण्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

 Agristack नोंदणी अनिवार्य

१००% अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे.

 प्रथम अर्ज – प्रथम प्राधान्य (FCFS)

बियाणे वाटप पहिले अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम या तत्त्वावर होणार असल्याने इच्छुकांनी विलंब न करता लगेच अर्ज करावा.

 अधिक माहितीसाठी

नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top