Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Sanjay Khadse : अभिनयातही प्रशासकीय तेज ; ‘पेटला वणवा क्रांतीचा’मध्ये एसडीओ प्रा. संजय खडसे यांची प्रभावी भूमिका  

Sanjay Khadse : विदर्भातील कलावंतांना मोठ्या पडद्यावर संधी देण्याच्या उद्देशाने निर्मित ‘पेटला वणवा क्रांतीचा’ हा चित्रपट १२ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी साकारलेली अधिकारीची भूमिका. वास्तविक प्रशासकीय अनुभव, शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि लोकसंपर्कातील पारंगतता यामुळे त्यांचे पात्र चित्रपटाला विलक्षण वास्तववादी भाव देत असल्याची चर्चा रंगली आहे.

 

Sanjay Khadse

गजानन भालेकर

धोत्रा नंदई  : विदर्भातील कलावंतांना मोठ्या पडद्यावर संधी देण्याच्या उद्देशाने निर्मित ‘पेटला वणवा क्रांतीचा’ हा चित्रपट १२ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी साकारलेली अधिकारीची भूमिका. वास्तविक प्रशासकीय अनुभव, शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि लोकसंपर्कातील पारंगतता यामुळे त्यांचे पात्र चित्रपटाला विलक्षण वास्तववादी भाव देत असल्याची चर्चा रंगली आहे.

प्रशासनातील अधिकारी ते पडद्यावरील कलाकार

प्रा. खडसे यांची प्रशासनातील कामगिरी, सांस्कृतिक ओढ, गायन-अभिनयाची आवड याबाबत विदर्भात पूर्वीपासूनच चर्चा असते. चित्रपटात त्यांनी जी व्यक्तिरेखा साकारली आहे ती त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून आकार घेतल्याने ती प्रेक्षकांना सहज भावणारी ठरते.
त्यांच्या संवादातील वजन, अधिकारी म्हणून आणलेली विश्वासार्हता आणि भूमिकेतील संतुलनामुळे चित्रपटाला एक खास धार प्राप्त झाली आहे.

चित्रपटात दाखविलेल्या एका प्रसंगात—
उडायचं फक्त तू मनात आण,
दिशांची तुला वाण नाही,
तुला अडवू शकेल असं तुफान नाही

असा संदेश विद्यार्थी देतात आणि त्यातून प्रेरित होऊन युवक गावाच्या विकासासाठी उभे राहतात—हा प्रसंग खडसे यांच्या भूमिकेला अधिक ताकद देणारा ठरतो.

 

खडसे दाम्पत्याचा पडद्यावरील समन्वय

चित्रपटात प्रा. खडसे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीता खडसे यांचाही सहभाग आहे. त्यांच्या अभिनयामुळे कथेला भावनिक आणि कौटुंबिक परिपूर्णता मिळते. दाम्पत्याचा पडद्यावर दिसणारा सहज समन्वय आणि भावनिक उर्जा प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

 

चित्रपटमागील मजबूत टीम

  • निर्मिती : मुकुंद नितोणे, प्रविण तायडे
  • कार्यकारी निर्माते : महेश भारंबे
  • सह-निर्माते : डॉ. सतिष खडसे, हर्षा तायडे, सुनैना नितोणे
  • छायांकन : शांताराम भोसले, विश्वास साठे
  • कला दिग्दर्शन : अनिल पुंडकर
  • संकलन : विश्वास साठे

कलाकारांमध्ये कुणाल शिरोळे, रूपाली जाधव, होणाजी चव्हाण, दिलीप केदार, विकास महाजन, भूमी दाली, राहुल तायडे, संगिता जामणिक, मा. कृष्णा शिंदे, पवन गावंड, स्वप्नाली बंड आदींचा समावेश आहे. स्वतः निर्माता मुकुंद नितोणे यांनीही चित्रपटात भूमिका साकारली आहे.हा चित्रपट विदर्भ संगीत के अनुकृतिक कला प्रसारक मंडळ यांनी निर्मित केला आहे.

 

विदर्भाची कथा, विदर्भाचे कलावंत — एक सांस्कृतिक महापर्व

‘पेटला वणवा क्रांतीचा’ हा समाजातील संघर्ष, प्रशासनातील अनुभव, भ्रष्टाचार-विरोधातील लढा आणि परिवर्तनाच्या दिशेने धाडसी पावले उचलणाऱ्या युवकांच्या कहाणीवर आधारित चित्रपट आहे. विदर्भातील प्रतिभावान कलाकारांना मोठ्या पडद्यावर संधी देणारा हा चित्रपट विदर्भाच्या कलासंपदेचा उत्सव ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

प्रा. संजय खडसे : वास्तव आणि अभिनयाचा संगम

प्रा. खडसे यांच्या भूमिकेसह प्रशासन, समाजकार्य आणि कलाक्षेत्र यांचा त्रिवेणी संगम या चित्रपटात दिसून येतो. त्यांच्या सशक्त अभिनयामुळे चित्रपटाला मिळालेली वास्तवतेची झलक प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवेल, असा विश्वास चित्रपट निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.१२ डिसेंबरपासून प्रदर्शित होणारा ‘पेटला वणवा क्रांतीचा’ हा चित्रपट विदर्भाच्या कलात्मक ऊर्जेला राष्ट्रीय पातळीवर पोहोचवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top