Mahabreaking

🔴 BREAKING
Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक

ST bus stand building : साखरखेर्डा येथे नवीन एसटी बसस्थानक इमारतीला मंजुरी द्यावी

ST bus stand building :  बसस्थानकाच्या अभावामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, साखरखेर्डा जिल्हा परिषद सर्कलच्या शिवसेनेच्या युवा नेत्या डॉ. भाग्यश्री खेडेकर यांनी साखरखेर्डा येथे नवीन एसटी बसस्थानक इमारत मंजूर करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.या वेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे आणि युवा सेनेचे जिल्हासरचिटणीस श्रीनिवास खेडेकर उपस्थित होते.

new ST bus stand
डॉ. भाग्यश्री खेडेकर यांचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन

गजानन भालेकर

धोत्रा नंदई  : साखरखेर्डा हे वेगाने विकसित होणारे शहर असून सध्या येथे १५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या राहते. साखरखेर्डा गावाशी जवळपास ३० ते ४० गावे थेट जोडलेली असल्याने व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि दळणवळणासाठी सक्षम वाहतूक सुविधा अत्यावश्यक आहेत. तसेच, साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन असल्याने भविष्यातील प्रशासकीय व भौगोलिक विकासाच्या दृष्टीने बसस्थानकाची गरज अधिक जाणवत आहे. बसस्थानकाच्या अभावामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, साखरखेर्डा जिल्हा परिषद सर्कलच्या शिवसेनेच्या युवा नेत्या डॉ. भाग्यश्री खेडेकर यांनी साखरखेर्डा येथे नवीन एसटी बसस्थानक इमारत मंजूर करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.या वेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे आणि युवा सेनेचे जिल्हासरचिटणीस श्रीनिवास खेडेकर उपस्थित होते.

निवेदनात डॉ. भाग्यश्री खेडेकर म्हणाल्या की, “साखरखेर्डा येथे बसस्थानक नसल्यामुळे एसटी बसेस रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होते आणि अपघाताचा धोका वाढतो. महिलांना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना व रुग्णांना थांबा, आसरा, पिण्याचे पाणी, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रवास अत्यंत कठीण व असुविधाजनक ठरतो. पावसाळा, उन्हाळा किंवा रात्रीच्या प्रवासात प्रतीक्षेसाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था उपलब्ध नाही. आसपासच्या जवळपास ४० गावांतील नागरिकांना बस पकडण्यासाठी रस्त्यावर उभे राहावे लागते. बसस्थानक नसल्यामुळे व्यापार, शिक्षण व आरोग्य सेवा मिळण्यात विलंब होतो.”

त्या पुढे म्हणाल्या की, “साखरखेर्डा येथे नवीन एसटी बसस्थानक इमारतीला मंजुरी दिल्यास प्रशासनाच्या सहकार्याने योग्य जागा उपलब्ध करून देता येईल. भविष्यात तालुका दर्जा प्राप्त झाल्यास हे बसस्थानक मुख्य वाहतूक केंद्र म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडेल. बसस्थानकामुळे साखरखेर्डा परिसरातील आर्थिक, व्यावसायिक आणि सामाजिक विकासाला मोठी गती मिळेल. आपल्या सकारात्मक निर्णयाने हजारो प्रवासी, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोठा दिलासा मिळेल.”त्यांनी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना साखरखेर्डा येथे नवीन एसटी बसस्थानक इमारत मंजुरीसाठी आवश्यक त्या सूचना करण्याची विनंती केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top