Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Poor quality food : अकोला येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन

Poor quality food : जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात तात्काळ सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केली आहे.

Poor quality food
सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेकडून आक्षेप; समाजकल्याण अधिकाऱ्यांना निवेदन

अकोला : जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात तात्काळ सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केली आहे.

अकोला विभागाच्या समाजकल्याण अधिपत्याखाली चालणाऱ्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या भोजनाच्या निकृष्ट दर्जाबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे गंभीर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. दिनांक ०३/१२/२०२४ रोजी अकोला येथील समाजकल्याण अधिकाऱ्यांना संघटनेतर्फे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची गुणवत्ता अत्यंत खालावलेली असून अन्नाची स्वच्छता, गुणवत्तेवर नियंत्रण, चव, पौष्टिकता यांसारख्या घटकांचा कोणताही शासकीय दर्जा पाळला जात नाही. सदर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यावर, मानसिक स्थितीवर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

निवेदनात वसतिगृहातील भोजन व्यवस्थेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, निकृष्ट अन्न पुरवठा करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर त्वरित दंडात्मक आणि शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी, नवीन भोजन पुरवठा व्यवस्था शासकीय कार्यपद्धतीनुसार पारदर्शकतेने सुरू करावी आणि गुणवत्ता तपासणी समिती तात्काळ स्थापन करावी, विद्यार्थ्यांच्या तक्रारींची नोंद व निवारणासाठी विशेष लेखी नोंदवही व यंत्रणा उपलब्ध करून द्यावी ,विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणाला शून्य सहनशीलता धोरणाने हाताळण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर योग्य व ठोस कारवाई केली नाही, तर संघटना विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील तीव्र आंदोलनात्मक पावले उचलण्यास बाध्य राहील.

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष इंजि. धिरज इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष स्वरूप इंगोले, प्रसिद्धी प्रमुख अंकित इंगळे, सोशल मीडिया प्रमुख अंकुश धुरंधर, सचिव राहुल खाडे, मंगेश बलखंडे, सोमेश दाभाडे, प्रकाश पाटील, मनिष लंगोट आदी विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top