Mahabreaking

[breaking_news]

Two serious accidents : दोन दिवसात दोन भीषण अपघात,तीन जण ठार

Two serious accidents : टाकरखेड भागिले शिवारात दोन दिवसात झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात तीन जण जण ठार झाले. धोत्रा नंदई गावाजवळ खडकपूर्णा नदीच्या वळाणावर भरधाव दुचाकीचा अपघात झाला तर पादचार्रयास ईस्टीका वाहनाने उडविल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Two serious accidents

टाकरखेड भागिले शिवारातील घटना ; भरधाव दुचाकीचा अपघात, पादचार्यास कारने उडविले

गजानन भालेकर 

धोत्रा नंदई : टाकरखेड भागिले शिवारात दोन दिवसात झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात तीन जण जण ठार झाले. धोत्रा नंदई गावाजवळ खडकपूर्णा नदीच्या वळाणावर भरधाव दुचाकीचा अपघात झाला तर पादचार्रयास ईस्टीका वाहनाने उडविल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
२ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता टाकरखेड भागीले शिवारातील खडकपूर्णा नदीच्या वळणाजवळ मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. यामध्ये कारभारी तुळशीराम पैठणे (वय ४०) आणि कारभारी संपत बनसोडे (वय ४८, दोघेही रा. धोत्रा नंदई) यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या अपघाताने धोत्रा नंदई गावावर शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
यापूर्वी १ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता टाकरखेड भागीले शिवारात पादचारी ज्ञानेश्वर प्रकाश भागीले यांना मागून ईस्टीका वाहन (क्र. MH-20-GC-9654) ने जोरदार धडक दिली. हे वाहन दीपक दादाराव खार्डे (रा. मेव्हणा राजा) यांच्या ताब्यात असल्याचे फिर्यादी रविंद्र सुखदेव भागीले (वय ४६) यांनी पोलिसात दिलेल्या तोंडी अहवालात नमूद केले आहे. धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर भागीले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका कलीम देशमुख व शरद साळवे करीत आहेत.दोन दिवसांत झालेल्या या दुहेरी अपघातांमुळे परिसरात भीतीचे व दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top