Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Paramahansa Shri Tejashwi Baba : परमहंस श्री तेजस्वी बाबांच्या जयघोषात लाखो भाविकांनी घेतला महाप्रसाद

Paramahansa Shri Tejashwi Baba : सिंदखेडराजा तालुक्यातील तिर्थक्षेत्र वरोडी येथे परमहंस श्री तेजस्वी बाबा यांच्या ९०व्या जन्मोत्सव सोहळ्यास एक लाखाहून अधिक भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता, तर महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. २१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. सकाळी सात वाजता बाबांची शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. अनिरुद्ध महाराज क्षिरसागर यांचे काल्याचे कीर्तन पार पडले.

Paramahansa Shri Tejashwi Baba

१६५ क्विंटल पुरी, १०० क्विंटल वांगी भाजी; शिस्तबद्ध नियोजनाने उत्सव यशस्वी

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील तिर्थक्षेत्र वरोडी येथे परमहंस श्री तेजस्वी बाबा यांच्या ९०व्या जन्मोत्सव सोहळ्यास एक लाखाहून अधिक भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता, तर महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. २१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. सकाळी सात वाजता बाबांची शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. अनिरुद्ध महाराज क्षिरसागर यांचे काल्याचे कीर्तन पार पडले.

अन्नदानकर्ते व देणगीदारांचा सत्कार
सात दिवस अन्नदान करणाऱ्यांचा तसेच एक लाखांहून अधिक देणगीदारांचा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. दुपारी बारा वाजता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांचे पुत्र श्रीनिवास खेडेकर, भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, उत्सव समितीचे अध्यक्ष व माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, शेंदुर्जनचे सरपंच संतोष शिंगणे, वरोडीच्या सरपंच अन्नपूर्णा गारोळे, सुधाकर गारोळे, विश्वस्त लक्ष्मणराव गारोळे, जनार्दन गुंजकर, जनार्दन गारोळे, माजी समाजकल्याण सभापती बाबूराव मोरे, योगेश जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर, माधवराव जाधव, संदीप मगर, जगदीश तुपकर, शामसुंदर जाजू आणि काशिनाथ गारोळे यांच्या हस्ते महाप्रसाद वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.

गर्दीने फुलले रस्ते
भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने साखरखेर्डा–वरोडी आणि देऊळगाव माळी–वरोडी मार्ग पूर्णपणे फुलून गेले होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गर्दीत मोठी वाढ झाली. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन करेवाड यांनी भरीव बंदोबस्त तैनात केला होता. १० पोलीस अधिकारी आणि १०० पोलीस कर्मचारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

महाप्रसादाचे भव्य नियोजन
महाप्रसादासाठी १६५ क्विंटल पुरी व १०० क्विंटल वांगी भाजी तयार करण्यात आली. पुरुष व महिला भाविकांसाठी प्रत्येकी १० अशा २० बॅरिगेट्सची व्यवस्था करून सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. स्वयंसेवक महिलांनी प्रसाद वितरणाचे काम अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पाडले.

दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग
बाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असून अनेक भाविकांना दूरूनच दर्शन घ्यावे लागले. सकाळी शोभायात्रेदरम्यान शेकडो भजनी मंडळे आणि दिड्या सहभागी झाल्या होत्या. “पावले हळूहळू चला, मुखाने तेजस्वी बाबा बोला” असा गजर भाविकांकडून सतत ऐकू येत होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top