Mahabreaking

[breaking_news]

Meritorious students : अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Meritorious students : अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था, बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रविवारच्या दिवशी डोणगाव येथे दहावी, बारावी तसेच पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, डोणगाव येथे संपन्न झाला.

Meritorious students

डोणगाव : अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था, बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रविवारच्या दिवशी डोणगाव येथे दहावी, बारावी तसेच पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, डोणगाव येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे जिल्हाध्यक्ष अरविंद सैतवाल यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा सचिव संजय माडीवाले, बुलढाणा तालुका उपाध्यक्ष अशोक बोराळकर, अमित काळे, राजूभाऊ धोंगडे, भिकाभाऊ पैठणकर आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील भरीव कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही विशेष सन्मान करण्यात आला. आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक भिकाभाऊ पैठणकर यांनी केले. तसेच ‘आचार्य आर्यनंदी दिनदर्शिका २०२६’ चे विमोचन राजूभाऊ धोंगडे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 वर्ग १० व १२ मधील उत्तम यश मिळवलेल्या अक्षरा नवनीत बोराळकर, केऊर योगेश आंबेकर, सम्यक प्रशांत मैंद, अक्षरा अमोल बेदरकर, पारस महावीर सातपुते, कल्पित संजय महाजन, श्रावणी संजय महाजन, सार्थक सचिन धोंगडे, आर्यन मनोज काळे, यश अविनाश बेदरकर, साहिल प्रमोद कुरकुटे, पारस योगेश काळे, दर्शना रुपेश काळे, सिद्धांत धीरज काळे, पूर्वा सतीश बेलोकार, कार्तिक नंदकुमार महाजन, तृप्ती महावीर सातपुते, दर्शन संतोष कुरकुटे, खुशी प्रवीण संगई, साक्षी नंदकुमार महाजन, निशांत संजय महाजन तसेच आयआयटी निवडीत यश मिळवल्याबद्दल संस्कार मिलिंद बोराळकर यांचा गौरव करण्यात आला.

मुंबईतील नामांकित महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केल्याबद्दल डॉ. प्रणया पंकज आंबेकर यांचा सन्मान झाला. तसेच अमरावती विद्यापीठाच्या बी.एस्सी. तृतीय सत्राच्या अभ्यासक्रमात पुस्तक निवड झाल्याबद्दल प्रा. सौरभ अरविंद आंबेकर, पाठशाळेतील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. उज्वलाताई प्रदीप बोराळकर, तसेच चातुर्मासादरम्यान आचार्य गुरुवर विद्यासागर महाराजांच्या पाणी व्यवस्थेसाठी कार्य करणारे देवेश धोंगडे, आदेश महाजन, सचिन धोंगडे, प्रतीक आंबेकर यांचाही सत्कार करण्यात आला.

चातुर्मासातील विविध व्यवस्था यशस्वीरित्या सांभाळल्याबद्दल प्रकाश देवेंद्र महाजन, महावीर केशवराव सातपुते, अमोल अरविंद महाजन, निलेश तेलकर यांचा गौरव झाला. आर्यनंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल अस्मिता प्रफुल महाजन हिचाही सन्मान करण्यात आला.

या माध्यमातून समाजातील सत्कार्यांचे कौतुक व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा हेतू असल्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद सैतवाल यांनी सांगितले. यावेळी मेहकर तालुकाध्यक्ष म्हणून निलेश गजाननराव तेलकर यांची निवड, तर उपाध्यक्षपदी भिकाजी पैठणकर (देऊळगाव साखरशी) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. लवकरच तालुका कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप प्रभाकर आंबेकर, सुधीर बोराळकर, अविनाश बेदरकर, किरण महाजन यांनी परिश्रम घेतले. सत्कार जितेंद्रजी लक्ष्मणराव आंबेकर यांनी केला, तर आभार प्रदर्शन योगेश अशोकराव आंबेकर यांनी केले. कार्यक्रमाची आखणी प्रा. अनंत शिरीष बोराळकर यांनी केली.  संचालन पंकज बबनराव आंबेकर यांनी केले. समाजबंधू-भगिनी व गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top