Various programs: पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिर, लक्ष्मी नगर, बोरगाव मंजू या मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त संत गजानन महाराज मंदिर सेवा समितीच्या वतीने १ डिसेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दोन दिवसीय धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

बोरगाव मंजू : पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिर, लक्ष्मी नगर, बोरगाव मंजू या मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त संत गजानन महाराज मंदिर सेवा समितीच्या वतीने १ डिसेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दोन दिवसीय धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, १ डिसेंबर रोजी संत गजानन महाराजांच्या मूर्तीची महापूजा आणि महाआरतीनंतर धार्मिक सोहळ्याची सुरुवात होईल. यानिमित्त मोक्षदा एकादशी व गीता जयंतीप्रसंगी श्रीमद् भगवद्गीता चे सामुदायिक पारायण सकाळी ७ ते १० या वेळेत व्यासपीठ गोपाल महाराज खंडारे यांच्या वाणीतून संपन्न होईल. तसेच श्री संत गजानन महाराज श्री विजय ग्रंथ सामुदायिक पठण दुपारी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत व्यासपीठ जयाताई मोरखडे (शेगाव) यांच्या उपस्थितीत पार पडेल.
मंगळवार, २ डिसेंबर रोजी काल्याचे कीर्तन महेश महाराज मारवाडी (आळंदी) यांच्या वाणीतून संपन्न होईल. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून संत गजानन महाराजांची महापूजा, महाआरती व महाप्रसादाचे वितरण होईल.
पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या दोन दिवसीय धार्मिक उत्सवाचा, महाप्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत गजानन महाराज मंदिर सेवा समिती, सेवाधारी माहुली व ग्रामस्थ बोरगाव मंजू यांनी केले आहे.

