Mahabreaking

🔴 BREAKING
Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद

Dhamma Rally: जागतिक धम्म परिषदेचा धम्म रॅली, ध्वजारोहणाने शुभारंभ

Dhamma Rally: बुलढाणा या ऐतिहासिक भूमीत २२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता धम्म रॅली आणि धम्म ध्वजारोहणाने जागतिक बौद्ध धम्म परिषदेचा शुभारंभ झाला.

Dhamma Rally
बुलढाणा : बुलढाणा या ऐतिहासिक भूमीत २२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता धम्म रॅली आणि धम्म ध्वजारोहणाने जागतिक बौद्ध धम्म परिषदेचा शुभारंभ झाला.
मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी धम्मबांधवांच्या सहकार्याने सलग दुसऱ्या वर्षी जागतिक स्तरावरील बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रांगणावर ही धम्म परिषद पार पडत आहे. पूज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो यांच्यासह भिक्खू संघांचे प्रवचन आयोजित केले आहे. परिषदेच्या निमित्ताने मलकापूर रोडवरील आंबेडकरनगर येथील महामानवांच्या तीन पुतळ्यांपासून धम्म रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून कार्यक्रमस्थळी भिक्खू संघाचे आगमन झाल्यानंतर धम्ममय वातावरणात स्वागत करण्यात आले.

Dhamma Rally

याठिकाणी भंते यश थेरो यांच्याहस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. स्वागत समारंभानंतर मूकनायक फाउंडेशन पुरस्काराचे सतीश पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.यानंतर भिक्खू संघाकडून धम्मदेसना देण्यास प्रारंभ झाला. या परिषदेत धम्म उपासक, उपासिका हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top