Mahabreaking

[breaking_news]

123 candidates withdraw ;पाच नगर पालिकांसाठी शेवटच्या दिवशी १२३ उमेदवारांची माघार

123 candidates withdraw ;नगरपरिषद निवडणुकांपूर्वी वाशिमसह जिल्ह्यातील पाच शहरांत राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. प्रभागांसाठी तब्बल १०६५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, मात्र, १८ नोव्हेंबरला छाननी प्रक्रियेत त्यातील २३८ अर्ज अवैध ठरल्याने ८२७ जण उरले होते. शुक्रवार २१ नोव्हेंबर रोजी माघारी फिरण्याच्या अंतिम मुदतीला तब्बल १२३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता ७१४ सदस्यपदासाठी, तर ५३ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणार राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

123 candidates withdraw

६९ प्रभाग : ७१४ सदस्य, तर नगराध्यक्षपदासाठी ५३ उमेदवार रिंगणात

वाशिम : नगरपरिषद निवडणुकांपूर्वी वाशिमसह जिल्ह्यातील पाच शहरांत राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. प्रभागांसाठी तब्बल १०६५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, मात्र, १८ नोव्हेंबरला छाननी प्रक्रियेत त्यातील २३८ अर्ज अवैध ठरल्याने ८२७ जण उरले होते. शुक्रवार २१ नोव्हेंबर रोजी माघारी फिरण्याच्या अंतिम मुदतीला तब्बल १२३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता ७१४ सदस्यपदासाठी, तर ५३ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणार राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत वाशिमसह रिसोड, मंगरूळपीर, कारंजा नगरपालिका आणि मालेगाव नगरपंचायत क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक इच्छुकांनी दाखल केलेल्या उमेदवारीमुळे चुरस वाढली होती. दुसरीकडे महत्प्रयास करूनही पक्षाचे तिकीट न मिळाल्याने असंतोष व्यक्त करत अनेकांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतल्याचे निदर्शनास आहे. दरम्यान, शुक्रवार २१ नोव्हेंबर पूर्वी वरिष्ठ नेत्यांकडून नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी नाजार उमेदवारांनी वरिष्ठ नेत्यांचा मान राखत माघार घेतल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना नाराज उमेदवारांच्य मनधारणीत मोठे यश आल्याचे दिसून येते. दरम्यान, ज्या ठिकाणी आक्षेप आहेत, अशा ठिकाणी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीचे मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबर रोजी निवडणूकीचे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.

 

कुठे किती उमेदवारांची माघार

न.प.             – सदस्य  – नगराध्यक्ष

वाशिम         –  ५०   –  ३

मंगरुळपीर   –  ११   –  १

मालेगाव       – ४     – ३

रिसोड          – २४   – २

कारंजा         – २४    – १

—————————–

एकूण    –   ११३      –  १०

 

कर्मचारी केले नियुक्त

निवडणूक विभागाने पाचही नगरपालिका क्षेत्रातील प्रभागांसाठी कर्मचाऱ्यांची टीम, बुथची प्राथमिक मांडणी व मतदानाच्या तयारीसाठी लागणारे साहित्य याबाबतची तयारी पूर्ण केली आहे. माघार प्रक्रियेनंतर उमेदवारांना चिन्ह वाटप व प्रभागनिहाय मतदानपत्रिकेचे डिझाईन तयार होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top