Mahabreaking

[breaking_news]

Water supply :बाळापूरच्या पाणीपुरवठ्याला ब्रेक! मुख्य पंप नादुरुस्त; दुरुस्तीसाठी अकोल्याचे पथक दोन दिवसांपासून तैनात

Water supply : शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील हेडवर्क्स येथील मुख्य पंप अचानक नादुरुस्त झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

Water supply

बाळापूरकरांवर पाणीटंचाईचे संकट; मुख्य पंप दुरुस्तीसाठी नगरपरिषदेची युद्धपातळीवर धडपड

झाकिर अहमद शेख

बाळापूर : शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील हेडवर्क्स येथील मुख्य पंप अचानक नादुरुस्त झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

मुख्य पंपाच्या दुरुस्तीसाठी अकोला येथील विशेष तांत्रिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. हे पथक मागील दोन दिवसांपासून सातत्याने दुरुस्तीचे काम करीत असून, तांत्रिक बिघाड दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील पाणीपुरवठा नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा उशिराने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अनावश्यक पाणी वाया घालवू नये आणि दुरुस्तीच्या कामात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने जाहीर सूचनेद्वारे केले आहे.

लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा

मुख्य पंपाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात नेण्यासाठी तांत्रिक पथक प्रयत्नशील आहे. लवकरच बाळापूर शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असा विश्वास नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागरिकांनी काही काळ संयम राखून पाणी बचतीला प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top