A grand celebration : शहरातील प्रसिद्ध सूफी संत हजरत सैय्यद शाह शरफोद्दीन अब्दाल रहमतुल्लाह अलैह यांच्या सालाना उर्सनिमित्त शहरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी दरबारी शाही संदलची धार्मिक परंपरेनुसार रस्म अदा करण्यात आली. यानंतर मुख्य शाही संदल रविवार, २२ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात काढण्यात येणार आहे.

वजीराबादमधून दुपारी ३ वाजता शाही संदलला प्रारंभ; रात्री दरगाह शरीफमध्ये होणार समारोप
झाकिर अहमद शेख
बाळापूर : शहरातील प्रसिद्ध सूफी संत हजरत सैय्यद शाह शरफोद्दीन अब्दाल रहमतुल्लाह अलैह यांच्या सालाना उर्सनिमित्त शहरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी दरबारी शाही संदलची धार्मिक परंपरेनुसार रस्म अदा करण्यात आली. यानंतर मुख्य शाही संदल रविवार, २२ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात काढण्यात येणार आहे.

डीएसएसबी ग्रुपचे अध्यक्ष आसिफ शाह यांच्या आयोजनातून निघणाऱ्या या शाही संदलचा प्रारंभ दुपारी ठीक ३ वाजता वजीराबाद येथील अब्दुल्लाह शाह साहेब यांच्या निवासस्थानापासून होणार आहे. शहरातील विविध प्रमुख चौक आणि वस्त्यांमधून मार्गक्रमण करीत हा शाही संदल रात्री १० वाजेपूर्वी हजरत शाह शरफोद्दीन अब्दाल सरकार यांच्या दरगाह शरीफ येथे पोहोचणार आहे.
असा राहणार शाही संदलचा मार्ग
वजीराबाद येथील अब्दुल्लाह शाह साहेब यांच्या निवासस्थानापासून शाही संदलला सुरुवात होईल. त्यानंतर शाही चौक, दरगाह चौक, जयस्तंभ चौक, सय्यदपुरा, शाही वजीराबाद, जुनी चावडी, मोठा मोमीनपुरा, ब्राह्मण बेस, लाल सवारी चौक आणि अंजुमन हायस्कूल रोडमार्गे हा संदल दरगाह शरीफ येथे पोहोचणार आहे.
हजरत शाह शरफोद्दीन अब्दाल यांच्या धार्मिक परंपरेशी जोडलेल्या या सोहळ्याला शहरातील भाविक आणि अकीदतमंद मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. श्रद्धा, भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या शाही संदलमुळे बाळापूर शहरातील धार्मिक वातावरण अधिक उत्साही होणार आहे.
या धार्मिक सोहळ्यात सर्व अकीदतमंदांनी सहभागी होऊन परंपरेचा मान राखावा आणि शाही संदलची शोभा वाढवावी, असे आवाहन डीएसएसबी ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

