Mahabreaking

[breaking_news]

A cruel twist of fate :काळाचा घाला! बोलेरो पिकअपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; आई गंभीर जखमी 

A cruel twist of fate : मेहकरहून जानेफळकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअपने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मेहकर येथील कंचणीचा महाल परिसरात हा अपघात घडला. या घटनेमुळे लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे गावावर शोककळा पसरली आहे. दत्तात्रय वसुदेव दहातोंडे असे मृतक तरुणाचे नाव आहे.

A cruel

कंचणीच्या महालाजवळ भीषण अपघात; मायलेक गंभीर जखमी, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू

मेहकर : मेहकरहून जानेफळकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअपने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मेहकर येथील कंचणीचा महाल परिसरात हा अपघात घडला. या घटनेमुळे लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे गावावर शोककळा पसरली आहे. दत्तात्रय वसुदेव दहातोंडे असे मृतक तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे येथील दत्तात्रय वसुदेव दहातोंडे हे आपली आई रत्नमाला वसुदेव दहातोंडे यांच्यासह दुचाकी क्रमांक एमएच २८ पी ७६८९ ने मेहकर येथून जानेफळच्या दिशेने जात होते. दरम्यान, कंचणीचा महाल परिसरात जानेफळकडून मेहकरकडे येणाऱ्या बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३७ टी ४३३३ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील मायलेक दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी मेहकर येथे हलविले. मात्र, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रय दहातोंडे यांना पुढील उपचारासाठी नेत असताना जालना येथे पोहोचेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. तर त्यांच्या आई रत्नमाला दहातोंडे यांच्यावर जालना येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

एकाच अपघातात मायलेकांवर काळाने घाला घातल्याने कोयाळी दहातोंडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, वृत्त लिहिपर्यंत या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top