Mahabreaking

[breaking_news]

Dr. Bhalchandra Chavan :‘स्वच्छ शौचालय, गरिमामय भविष्य’ अभियानाला बुलढाणा जिल्ह्यात सुरुवात; नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – डॉ. भालचंद्र चव्हाण

Dr. Bhalchandra Chavan : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात ‘स्वच्छ शौचालय, गरिमामय भविष्य’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक, सामुदायिक तसेच शाळा व अंगणवाड्यांमधील शौचालयांची स्वच्छता, सुरक्षितता आणि उपयुक्तता वाढविण्यासोबतच प्रत्येक कुटुंबाने वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करावा, यासाठी या अभियानात विशेष भर दिला जाणार आहे. या अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी केले आहे.

Bhalchandra Chavan

शौचालयांची स्वच्छता, सुरक्षितता आणि नियमित वापरावर भर; १० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात विशेष अभियान

बुलढाणा : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात ‘स्वच्छ शौचालय, गरिमामय भविष्य’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक, सामुदायिक तसेच शाळा व अंगणवाड्यांमधील शौचालयांची स्वच्छता, सुरक्षितता आणि उपयुक्तता वाढविण्यासोबतच प्रत्येक कुटुंबाने वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करावा, यासाठी या अभियानात विशेष भर दिला जाणार आहे. या अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने यंदाच्या जागतिक शौचालय दिनासाठी ‘सुरक्षित शौचालये, समान भविष्य’ ही संकल्पना निश्चित केली आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

शौचालयांची स्वच्छता व दुरुस्तीवर विशेष भर

अभियानांतर्गत ग्रामीण भागातील सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छता संकुले, शाळा आणि अंगणवाड्यांमधील शौचालयांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व सुधारणा करण्यात येणार आहेत. विशेषतः महिला, विद्यार्थिनी आणि दिव्यांग व्यक्तींना शौचालयांचा सुरक्षित व सुलभ वापर करता यावा, यासाठी आवश्यक सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

तसेच एक खड्डा असलेल्या शौचालयांचे दोन खड्ड्यांच्या शौचालयांमध्ये रूपांतर करणे, सोकपिट नसलेल्या सेप्टिक टँकमध्ये सोकपिटची सुविधा उपलब्ध करून देणे आणि मैला गाळ व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करण्याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

हागणदारीमुक्त गावांचा दर्जा कायम राखण्यासाठी जनजागृती

गावांचा हागणदारीमुक्त दर्जा कायम राखणे, शौचालयांचा नियमित वापर करणे, साबणाने हात धुण्याची सवय रुजविणे आणि घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांमध्ये ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट आणि ग्रामस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे.

उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सार्वजनिक स्वच्छता संकुलांसह संस्थात्मक व वैयक्तिक घरगुती शौचालयांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती आणि लाभार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. ९ व १० डिसेंबर रोजी जिल्हा व ग्रामपंचायत स्तरावर सांगता कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, अभियानाची प्रगती स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या निर्धारित प्रणालीवर नोंदविण्यात येणार आहे.

स्वच्छता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी

स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. शौचालयांचा नियमित वापर, त्यांची स्वच्छता व देखभाल आणि गावातील स्वच्छतेचे वातावरण टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) सतीश देशमुख यांनी केले आहे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top