Mahabreaking

[breaking_news]

Death scare :बाळापूर-पातूर मार्गावर मृत्यूचा थरार! दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा करुण अंत

Death scare : बाळापूर-पातूर मार्गावर पेट्रोलपंपाजवळील राजमुद्रा हॉटेलसमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

Death scare

राजमुद्रा हॉटेलसमोर भीषण अपघात; ट्रक अंगावरून गेल्याने दोघांचा मृत्यू, एक गंभीर

राहुल सोनोने

वाडेगाव : बाळापूर-पातूर मार्गावर पेट्रोलपंपाजवळील राजमुद्रा हॉटेलसमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस बु. येथील धीरज अशोक गवई (वय ३१) हा दुचाकीने घरी जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्याची जोरदार धडक झाली. या दुसऱ्या दुचाकीवर गजानन पुंडलिक गायकवाड (वय २५) आणि महेश दत्ता बरडे (वय २५, दोघेही रा. असोला, ता. व जि. वाशिम) हे प्रवास करीत होते.

दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर तिन्ही युवक रस्त्यावर कोसळले. याचवेळी तेथून जाणाऱ्या ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने गजानन पुंडलिक गायकवाड याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी एका युवकाचा मृत्यू झाला, तर महेश दत्ता बरडे हा गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सेंदाने, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश ढोरे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बाळापूर येथे पाठविले. जखमी युवकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top